उमेश गुप्ता महाराष्ट्र श्री – गतविजेत्या हरमीत सिंगवर केली मात
पुणे, (क्री.प्र.)- मूर्ती छोटी, पण किर्ती महान. अवघ्या सव्वा पाच फूट उंचीच्या मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ताने गतविजेत्या हरमीत सिंग आणि कमलेश अच्चरा या आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या शरीरसौष्ठवपटूंवर मात करत प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र श्रीवर आपल्या नावाची मोहोर उमटवली. महिलांच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत मुंबई उपनगरच्याच रेखा शिंदेने बाजी मारली. गेल्यावर्षीही तिनेच मिस महाराष्ट्रचा मान मिळवला होता. पुरुषांच्या फिजीक…
