पाकिस्तानचा झेंडा जाळताच – सांताक्रूझमध्ये देशप्रेमी तरुणाला मारहाण
मुंबई/पहेलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला करून २७ जणांचा जीव घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात, देशभर संतापाची लाट उसळली आहे. लोक रस्त्यावर उतरून पाकिस्तानचे झेंडे जाळत आहेत. मात्र देशातील काही छुप्या पाकिस्तानी प्रेमींना पाकिस्तानचे झेंडे जाळणे आवडलेले नाही. म्हणूनच मुंबईच्या सांताक्रुज मध्ये एका तरुणाने पाकिस्तानचा झेंडा जाळताच त्याला काही पाकिस्तान प्रेमींनी बेदम मारहाण केली. तर नालासोपाऱ्यात पाकिस्तानी झेंड्या बद्दल आदर दाखवणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पाकिस्तान प्रेमींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात ,पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले होते .लोक रस्त्यावर उतरून पाकिस्तानचा धिक्कार करीत आहेत. पाकिस्तान विरुद्ध घोषणा देत आहेत. पाकिस्तानचे झेंडे जाळले जात आहेत. पण मुंबईत काही छुपे पाकिस्तानी प्रेमी आहेत .त्यांना मात्र हे सर्व आवडलेले नाही. सांताक्रुज मध्ये अशाच एका घटनेत एका तरुणाने पाकिस्तानचा झेंडा जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी त्या भागातील काही तरुणांनी, पाकिस्तानी झेंडा जाळणाऱ्या तरुणाला पकडून त्याला बेदम मारहाण केली .त्याचे डोके फोडण्यात आले. तसेच त्याला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी सदर तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. तर १५ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. असाच एक प्रकार नालासोपाऱ्यामध्येही घडला. नालासोपाऱ्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे असलेले काही पोस्टर्स डांबरी रस्त्यावर चिकटवण्यात आले होते. त्याला काही पाकिस्तानी प्रेमी तरुणांनी आक्षेप घेतला. आणि डांबरी रस्त्यावर चिकटवलेले हे पोस्टर्स काढायला सांगितले. त्यावरून दोन गटात बाचाबाची आणि हाणामारी झाली .या प्रकरणी पाकिस्तानी प्रेमी तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या घटनांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, अशा प्रकारे जर कोणी पाकिस्तान प्रेम दाखवणार असेल तर त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. या दोन्ही घटनांमुळे मुंबई संतापाची लाट उसळली आहे.
तसेच मुंबई आणि आसपासच्या परिसरात जे कोणी पाकिस्तान प्रेमी असतील, त्यांना पोलिसांनी शोधून काढावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत याची पोलीस काळजी घेतील असे सांगितले जात आहे .देशाच्या इतर काही भागांमध्येही असेच प्रकार घडत आहेत. खास करून कर्नाटक मधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये असे प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक सरकारमधील मंत्री आणि काही आमदार सातत्याने पहेलगाम हल्ल्याप्रकरणी अत्यंत चुकीची भूमिका घेत असल्याने, कर्नाटकातील हिंदुत्ववादी आणि सत्ताधारी काँग्रेस यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे .मुख्यमंत्री सिद्धरामय्या व त्यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे .या दोघांनी पहेलगाम हल्ल्याबाबत संशय व्यक्त केला होता. तसेच धर्म विचारून गोळ्या झाडणे अशक्य आहे अशी विधाने केली होती. त्यामुळे सिद्धरामय्या आणि त्याच्या मंत्रिमंडळातील त्या मंत्राटविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
