ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

भारताला पाठिंबा देणाऱ्या इस्त्राईलच्या विमानतळांवर हुती बंडखोरांचा हल्ला

तेल अविव/पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात भारताला संपूर्ण जगाचा पाठिंबा मिळत आहे .त्यामुळेच पाकिस्तानी आतंकवाद्यांचे समर्थक असलेल्या हुती बंडखोरांचा जळफळाट झाला असून, इस्त्राईलने भारताला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे संतापलेल्या हुती बंडखोरांनी इस्त्राईलच्या विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. यात सहा जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान पाकिस्तान वर हल्ला झाल्यास बदला घेण्याची धमकी ही हुती बंडखोरांनी दिली आहे.
रविवारी सकाळी येमेनच्या इराण समर्थित हुथी बंडखोरांनी इस्रायलमधील सर्वात व्यस्त विमानतळ, बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यामुळे दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान ए एल१३९अबू धाबीला वळवावे लागले. यावेळी विमान उतरण्यासाठी फक्त एक तास शिल्लक होता. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटराडार २४ नुसार, त्यावेळी विमान जॉर्डनच्या हवाई क्षेत्रात होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात सुमारे ३०० लोक होते. इंडियाने पुष्टी केली आहे की, विमान अबू धाबीमध्ये सुरक्षितपणे उतरले आहे आणि लवकरच ते दिल्लीला परत येईल.
क्षेपणास्त्रामुळे विमानतळ परिसरात असलेल्या रस्त्याचे आणि वाहनाचे नुकसान झाले. इस्रायली सैन्याने कबूल केले आहे की, त्यांची संरक्षण प्रणाली हे क्षेपणास्त्र रोखण्यात अपयशी ठरली. त्याची पडताळणी केली जात आहे. या हल्ल्यात ८ जण जखमी झाले आहेत.हुती बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि म्हटले की हा हल्ला इस्रायलने गाझावरील लष्करी कारवाई आणि मार्च २०२२ पासून सुरू असलेल्या नाकेबंदीच्या निषेधार्थ तसेच भारताला पाठिंबा दिल्याबद्दल करण्यात आला.प्रवक्ते याह्या सारी म्हणाले की, हल्ल्यात ‘पॅलेस्टाईन-२ हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र’ वापरण्यात आले. ते इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेत घुसले. तथापि, इस्रायली लष्कराने हायपरसोनिक मिसाईल नष्ट केले.आणि हुती बंडखोरांवर पलटवार केला

error: Content is protected !!