[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका – हिंदुजा मध्ये दाखल

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं आहे. सध्या ते आयसीयूमध्ये दाखल आहेत
काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.
मनोहर जोशी हे मूळचे बीडचे आहेत. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं. 1995 साली राज्यात ज्यावेळी युतीची सत्ता आली त्यावेळी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले.
गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नाहीत. त्यांचा मुलगा उन्मेश हे बांधकाम व्यावसायिक आहेत.

error: Content is protected !!