मुबई/ आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागात तणावाचे वातावरण आहे . काल महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांची एक संयुक्त बैठक पार पडली यात कायदा आणि सुव्यवस्थेला कुठूनही अडचण येणार नाही यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत यावर चर्चा झाली . त्याच बरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दोन्हीकडच्या पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे . खास करून महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेत्यांवर पोलिसांची नजर असेल काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंमयी यांनी सांगली जिल्ह्यातील 42 गावांवर तसेच सोलापूर अक्कलकोट येथील कानडी भाषिक गावांवर आपला हक्क सांगितला होता तेंव्हापासून तणाव निर्माण झाला आहे .
Similar Posts
तुकाराम महाराज शेतकरी बीज महोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ !
शेतकरी कीर्तन महोत्सवात शाश्वत शेतीवर चिंतन _ प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्यासहमान्यवरांचा सहभाग परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : शेतकरी केंद्र बिंदू असलेल्या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या तिसऱ्या वर्षी शाश्वत शेती विषयावर दिग्गजांचे मार्गदर्शन मिळणार आहे. अध्यात्मिक चळवळीतू शेतकऱ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि भौतिक विकासाला आकार देण्याचा प्रयत्न केला जात असून त्याला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या…
गडकरींच्या लेटर बॉम्ब नंतर मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
मुंबई/ वाशिम जिल्ह्यात रस्त्यांच्या कामात शिवसेना कार्यकर्त्यांनी अडथळे आणल्यामुळे कामे रखडत आहेत ही बाब केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री समजताच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत.दरम्यान या घटनेची काँग्रेसने सुधा गंभीर दखल घेतली असून या मुद्द्यावर गडकरींच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय…
लाडक्या बहिणींनी महायुतीला तारले
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी वीस मे रोजी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचा आज निकाल लागला. या निवडणुकीत मध्य प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्राची लाडकी बहिणी योजना निर्णायक ठरली. आणि लाडक्या बहिणीने भरभरून भ्रष्टाचारी आणि जातीयवादी भावांच्या पारड्यात मतं टाकली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बॅक फुटवर गेलेले भाजपवाले फ्रंट पोस्टवर आले. या निकालाने एक गोष्ट मात्र निश्चित…
वाशीत अमली पदार्थ विरोधी पथकावर ड्रग माफिया हल्ला; पाच अधिकारी जखमी
नवी मुंबई/ सध्या नायजेरीयन ड्रग माफिया उन्मत्त झाले असून नाला सोपारा पाठोपाठ त्यांनी आता नवी मुंबई मध्ये आसरा घेतला आहे.दरम्यान या ड्रग माफियांच्या हालचालीची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकास मिळताच समीर वानखेडे यांच्या नेतृत्वखालील पथकाने वाशी खाडी पूलाजवली एका ठिकाणी छापा टाकला यावेळी स्थानिकांच्या मदतीने या ड्रग माफियानी या पथकावर हल्ला केला यात ५ अधिकारी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजरंडेश्वर ची साखर अजितदादांना कडू
मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1200 कोटींचा जरंडेश्वर साख़र कारखाना घोटाळा सिद्ध झाला असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली होती.ही कारवाई योग्य असल्याची मान्यता कोर्टाने दिली आहे. हा कारखाना शेतकर्यांचा ताब्यात द्या, अशा आग्रह भारत सरकार आणि ईडीचा असल्याचे किरीट सोमय्या यांनी आहे. त्याच्या या वक्तव्याला आता राष्ट्रवादीचे…
रुपयाच्या “दुखण्यावर” रिझर्व बँकेचा “डॉक्टर” अपयशी ठरतोय ?
अंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची मक्तेदारी अजूनही अभेद्य आहे. डॉलरच्या सशक्तपणामुळे भारतीय रुपया अशक्त बनत चालला असून त्याचा मोठा फटका उद्योगांना, निर्यातदारांना बसत आहे. रिझर्व्ह बँक या रुपयाच्या दुखण्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु हे प्रयत्न पुरेसे व सफल होताना दिसत नाहीत. यावर लवकरच काहीतरी धोरणात्मक किंवा रचनात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. या समस्येचा घेतलेला वेध….
