राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्या चां विषय उकरून काढून आणि हनुमान चालिसला अच्छे दीन आले ज्याने कधी हनुमंताच्या देवळाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते ते आज हनुमान चालीसा पठाण करायला निघालेत. रवी राणा सांगतोय की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत महाराष्ट्रावरील संकटे दूर व्हावीत म्हणून त्याला मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायचं आहे . पण महाराष्ट्रातल्या शेतकरी इथला कष्टकरी यांच्याबद्दल या पूर्वी रवी राणा इतका कधी भाविक झाला नव्हता .महाराष्ट्रात 40 हजार कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यातील 70 टक्के आत्महत्या रवी रणाच्या विदर्भात झाल्या आहेत.त्यात त्याच्या बायकोच्या अमरावती लोकसभा मतदार संघातील तसेच रवी रानाच्या बडनेरा मतदार संघातील शेतकऱ्यांचा सुधा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे . त्यांच्यासाठी यापूर्वी कधी राणा दांपत्याने हनुमान चालीसा पठण केले नाही किंवा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांना कधी चार पैशाची मदत केली नाही .पण भाजपचा त्यांना टेकू मिळताच त्यांनी शिवसेनेशी पगा घ्यायला सुरुवात केली .पण शिवसेना भाजपच्या संघर्षात यांची अवस्था किड्या मुंग्यांसारखी होणार आहे.कधी कुठे आणि कसे चिरडले जातील याचा त्यांना पत्ताही लागणार नाही. एस टी कामगारांनी असाच अतिरेक करून पवारांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता . आज काय त्यांची अवस्था झालीय ते तरी बघा! त्यामुळे कोणाच्या तरी चिथावणी वरून मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानी हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरायचा आणि शिवसेनेच्या रोषाला कारणीभुत व्हायचे हे बरोबर नाही . कारण उद्या जर शिवसैनिकांनी याना फटकावले तर भाजपवाले सोडवायला येणार नाहीत.याची तरी त्यांना अक्कल असायला हवी होती.त्यांच्या मतदार संघात येवढे प्रश्न असताना नको तो विषय घेऊन काहीतरी बालिशपणा करायचा हे आता पुरे झाले . कारण संपूर्ण महाराष्ट्र बघतोय या लोकांचे नाटक! आणि महाराष्ट्राला ही अशी नाटके नवी नाहीत .मोठ्या मुश्किलीने मिळालेली आमदारकी आणि खासदारकी टिकवून लोकांचे प्रश्न सोडवायचे सोडून कोणाच्या तरी सांगण्यावरून नको ते धाडस करायचे आणि नंतर पश्चात्ताप करायचा हे काही बरोबर नाही.
Similar Posts
महाराष्ट्राचा भूगोल बदलतोय – बेसावध राहू नका- राज ठाकरे
पुणे – मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आज पुण्यात राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या जमिनी विकणाऱ्या मराठी माणसांना सावधानतेचा इशारा दिला. ते म्हणाले शिवडी न्हावा शेवा पूल होत आहे. त्यामुळे भलेही मुंबई – अलिबाग मधील अंतर कमी झालेले असले तरी धोका रायगडला त्याचा मोठा धोका वाढलाय . कारण…
बालवाडी शिक्षिका न्यायाच्या प्रतीक्षेत
मुंबई/बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येणाऱ्या बालवाड्यांमध्ये कार्यरत असलेल्या शेकडो शिक्षिका गेल्या काही वर्षांपासून अन्यायकारक परिस्थितीचा सामना करत आहेत. वय ५८ वर्षे झाल्याचे दाखवून अनेक जुन्या आणि अनुभवी शिक्षिकांना कामावरून रीतसर नोटीस न देता सेवा संपवली जात आहे. त्यांच्या जागी नव्या शिक्षिकांची भरती केली जात असून, दोघींनाही योग्य मानधन मिळत नाही.असा आरोप आयोजक रूपा रेडकर व स्वप्ना…
मोकाशी कॉलेज चा निकाल शंभर टक्के
कराड -राजमाची येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित वेस्टफिल्ड ज्युनियर कॉलेजचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला .सायन्स शाखेमध्ये ऋतुजा यादव हिने 93 .67 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला . जान्हवी देसाई 93. 17,’फराज खान हिने 91.83, विनायक यादव यांनी 89. 17 , प्रतीक्षा पवार हिने 86 .33 गुण मिळवून विशेष प्राविण्य श्रेणी…
अखेर विधान परिषदेवर त्या 11 आमदारांचा शपथविधी
मुंबई/उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात विधान परिषदेसाठी 11 सदस्यांची नावे देण्यात आली होती पण अखेरपर्यंत त्या यादीतील लोकांना काही आमदारकी मिळालेली नाही. कारण तात्कालीन राज्यपाल भगतसिंग कोसारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी दाबून ठेवली आणि अखेरपर्यंत मवियाच्यात्या सदस्यांना विधान परिषदेवर जाता आले नाही त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि भाजपा शिंदे गट व अजित पवार…
कथा दोन हजारांच्या नोटेची; व्यथा नोटाधारकांची !
रिझर्व बँकेने गेल्या शुक्रवारी मोठी घोषणा करून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्या. सुमारे सहा वर्षांपूर्वी या नोटा बाजारात सादर केल्या होत्या. रिझर्व बँकेला असे वाटते की मोठ्या प्रमाणावर काळा पैसा या नोटांमध्ये दडलेला आहे किंवा बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. तसेच कर चुकवण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. याची सत्यता आणखी काही…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या – राज ठाकरे
मुंबई: मोदी सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर केलेल्या भारतरत्न पुरस्कारांच्या घोषणेचा पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. केंद्र सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुस्कार घोषित करावा, असे राज ठाकरे म्हटले आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, ‘माजी पंतप्रधान…
