बैल गेला आणि झोपा केला अशी एक म्हण आहे आणि ती सरकारच्या बाबतीत खरीच आहे. महाराष्ट्रात कोरोणाचि तिसरी लाट आली दर दिवशी कोरॉनाचे ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडायला लागले तरी सुधा सरकार शांत होते आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर कठोर निर्बंध लावण्याची घोषणा केली .त्यानुसार मध्यरात्री पासून राज्यात दिवसाची जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे हॉटेल्स,रेस्टॉरंट,दुकाने आदी ठिकाणी ५० टक्क्यांची मर्यादा ठेऊन हे सगळ चालू ठेवण्याचा निर्णय ठीक आहे कारण कोरोणाची भीती असली तरी पोटापाण्याचा सुधा प्रश्न आहेच त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण गर्दीची आणखीही ठिकाणे आहेत यामध्ये लोकल ट्रेन,राजकीय पक्षांची आंदोलने यात्रा,महाराष्ट्राच्या ठीक ठिकाणच्या एस टी डेपो मध्ये सुरू असलेली आंदोलने नेत्यांच्या पोरा बाळांचे शाही विवाह सोहळे मार्केट,आणि मास्क चां नियमाला न जुमानता बेधडक रेल्वे स्टँड बस स्टँड येथे फिरणारे रिक्षा आणि टॅक्सी वाले यांचे काय करणार ? आपल्याकडे फक्त नियम केले जातात पण त्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी मात्र केली जात नाही.आणि जे नियम करतात तेच नियम तोडतात महाराष्ट्रात मास्क बाबतचा नियम दोनच नेते काटेकोरपणे पाळतात एक उप मुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे स्वतः मुख्यमंत्री उधव ठाकरे त्यामुळे कोरोना त्यांच्या जवळपासही फिरकू शकला नाही. सध्या महाराष्ट्राचे जे १० मंत्री आणि ७० आमदार कोरोना बाधित झाले आहेत त्यांनी जर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन केले असते तर त्यांना कोरोना झालाच नसता.तेंव्हा अगोदर राजकीय नेत्यांनी नियम पाळावेत आणि नंतर इतरांना सांगावे.कारण कोरोना चे हे संकट कुठल्या एका वर्गासाठी नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी आहे आणि कोरोनचि निर्मिती सुधा मानवाने च केलेली आहे म्हणूनच आता कोरोना मानव जातीचाच घास घ्यायला निघाला आहे.तेंव्हा आता तरी सरकारच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी तरच तिसरी लाट थोपावण्यात यश येईल आणि कोरोनांचे नियम काटेकोरपणे पळण्याबाबतची सुरुवात पुढाऱ्यांनी आपल्यापासून करावी.अशा परिस्थितीत लोकांमध्ये मिसळायलाच हवे असा काही नियम नाही मंत्री आणि आमदार सुधा वर्क फ्रॉम होम करू शकतात तातडीच्या कामासाठी व्हिडिओ कन्फर्सिंग द्वारे प्रशासनातील अधिकारी वर्गाला आदेश देऊ शकतात कारण शेवटी राज्याचा गाडा हाकण्याचे काम प्रशासन करीत असते मंत्री संत्री फक्त राज्याच्या विविध प्रश्नांबाबत विकासाबाबत धोरण ठरवत असतात त्या धोरणाची अमल बजावणी प्रशासन करीत असते .त्यामुळे मंत्र्या संत्र्यानी घरातच बसून राहावे.बाहेर फिरण्याची आणि लोकांच्या गर्दीत मिसळण्याची काहीच आवश्यकता नाही राज्याचा कारभार चालण्यासाठी मंत्री आणि लोक प्रतिनिधींनी घराबाहेर पडायला पाहिजे असा काही नियम नाही.
Similar Posts
रुपयाच्या “दुखण्यावर” रिझर्व बँकेचा “डॉक्टर” अपयशी ठरतोय ?
अंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची मक्तेदारी अजूनही अभेद्य आहे. डॉलरच्या सशक्तपणामुळे भारतीय रुपया अशक्त बनत चालला असून त्याचा मोठा फटका उद्योगांना, निर्यातदारांना बसत आहे. रिझर्व्ह बँक या रुपयाच्या दुखण्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु हे प्रयत्न पुरेसे व सफल होताना दिसत नाहीत. यावर लवकरच काहीतरी धोरणात्मक किंवा रचनात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. या समस्येचा घेतलेला वेध….
डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने रोखली विद्यार्थ्यांची वाट
आणखी किती दिवस त्यांच्या तालावर नाचणार आहात? पालकांचा संतप्त सवालमुंबई/ गेल्या सव्वा वर्षा पासून कोरोंनाच्या भीतीने शाळा कॉलेज बंद आहेत त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळ्खंडोबा झालाय .मात्र आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे .त्यामुळे सरकारने १७ ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता पण त्याला डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने विरोध केला आहे त्यामुळे शाळा सुरू…
महाराजांचा पुतळा कोसळण्याला जबाबदार असणा-यांना माफी नाही: खा. शाहू महाराज
मुंबई,-भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला आहे. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली पण हे पाप…
पुण्यात स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा
पुणेः परवा पुण्यात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची धक्कादायक घडली घडली होती. आता पुन्हा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान झिंदाबादचे नारे लाव‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार पुण्यातील कोंढवा भागात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दोघांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले. दोन्ही आरोपी बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना अटक केली आहे’मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कोंढवा भागात…
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ३५ हजार कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण
नवी मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिवडी-नाव्हा शेवा अटल सागरी सेतूचं उद्घाटन झालं. या सेतूच्या उद्घाटनानंतर नवी मुंबई विमानतळाच्या मैदानावर मोदींची सभा पार पडली. यावेळी मोदींनी 35 हजार कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण केलं. त्यानंतर त्यांनी धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा पाढा वाचला. तसेच विकासकामांसाठी मोदी सरकार समुद्रालादेखील धडकू…
नेपाळमध्ये बस नदीत कोसळून २७ ठार – बहुतेक प्रवासी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील
काठमांडू – महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी उत्तर प्रदेशची बस नेपाळमध्ये नदीत पडली आहे. या बसमध्ये ४० प्रवासी होते. या अपघातात २७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात एक बालकही आहे. ३१ जण जखमी आहेत. यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस पोखराहून काठमांडूला जात होती. यावेळी ती नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत…
