मुंबई, दि. (प्रतिनिधी) : इच्छाशक्ती असली की एखादे काम पूर्ण करता येते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक अवघ्या चार वर्षांत उभे करुन दाखवून दिले आहे. २०१४ पूर्वी केवडिया हे कुणाला माहित होते ? स्टेच्यूऑफ युनिटी च्या माध्यमातून जर केवडिया जगाच्या नकाशावर येऊ शकते तर मग ज्या आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ ६ जानेवारी १८३२ रोजी रोवली त्या बाळशास्त्रींचे पोंभूर्ले हे जन्मगाव जगाच्या नकाशावर का येऊ शकत नाही ? असा सुस्पष्ट सवाल करुन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभूर्ले येथील राष्ट्रीय स्मारकासाठी सर्वच पत्रकार संघटनांनी एकत्र यावे, असे कळकळीचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेल्या पोंभूर्ले येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी दर्पण पुरस्कार विजेते या नात्याने योगेश वसंत त्रिवेदी यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करुन पोंभूर्ले हे जागतिक नकाशावर आणण्यासाठी सर्वच पत्रकारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मराठी पत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली त्या बाळशास्त्रींच्या जन्मगावी येण्याची आणि त्यांच्या घराची पवित्र माती भाळी लावण्याचे भाग्य आम्हाला केवळ रवींद्र बेडकिहाळ यांच्या मुळेच मिळाले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून योगेश वसंत त्रिवेदी यांनी पुढे सांगितले की, मुंबई येथे सुद्धा आचार्य बाळशास्त्री यांचे स्मारक उभे राहावे ही कल्पना चांगली आहे परंतु मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मारके रांगेत आहेत, ही कधी उभी राहणार ? याचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले आहे. मग बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी कोण, कधी आणि कसे प्रयत्न करणार ? हाच खरा प्रश्न आहे. मुंबई येथे जरुर बाळशास्त्रींचे स्मारक उभे रहायला हवे पण त्याचबरोबर पोंभूर्ले ही पत्रकारांची पंढरी, पत्रकारांची काशी अयोध्या आहे, या भूमीला जगाच्या नकाशावर आणणे हाच पत्रकार दिनाचा खरा संकल्प योग्य ठरेल, असे सांगून योगेश वसंत त्रिवेदी यांनी हिंदी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाबूराव विष्णू पराडकर यांचे पराड हे कोकणातले गाव सुद्धा आपण पुढे आणले पाहिजे, असेही सांगितले. कोकण हे निसर्ग समृद्ध असून पर्यटनाच्या द्रुष्टीने महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो याच द्रुष्टिकोनातून पोंभूर्ले आणि पराड यांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास व्हावा, ओघानेच बाळशास्त्री आणि बाबूराव पराडकर यांची स्मृती चिरंतन राहील, असेही योगेश त्रिवेदी यांनी आवर्जून नमूद केले. रवींद्र बेडकिहाळ, लोकमत कोल्हापूर चे संपादक वसंतराव भोसले, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर आदी मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले.
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईमहाराष्ट्र हादरला ! मिरज जवळ डॉक्टर कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या
सांगली/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक भयंकर घटना काल सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ मध्ये घडली असून डॉक्टर वांमोरे यांच्या कुटुंबातील ९ जनानी विष घेऊन आत्महत्या केली या घटनेने मोठी खळबळ माजली असून पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे. आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52),…
भिवंडीत बनावट नोटा बनविणारी टोळी जेरबंद करण्यात शांतीनगर पोलिसांना यश -2 लाख 19 हजार रुपयांच्या नोटा यंत्रसामुग्री जप्त
भिवंडी दि 25 (आकाश गायकवाड ) विविध गुन्हेगारी घटनां मध्ये वाढ होत असतानाच शहरात बनावट नोटा बनवून चलनात आणण्याच्या इराद्याने कार्यरत असणारी टोळी उध्वस्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले असून या टोळी च्या ताब्यातून 500 व 100 रुपये दराच्या 2 लाख 19 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा व नोटा छपाई साठी उपयोगात आणला जाणार कागद…
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मुख्यमंत्र्यांचा दिलासा धीर सोडू नका
मुंबई/ यंदाच्या पावसाळ्यात तीन वेळा अतिवृष्टी होऊन त्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे prchand नुकसान झाले आहे.नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात गावेच्या गावे बुडाले शेतीवाडी घरदार सारेकाही उध्वस्त झाले या उध्वस्त शेतकऱ्याला सावरण्यासाठी सरकारने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून मुख्यमंत्र्यांनी सलग दोन दिवस बैठका घेऊन जिल्हावार नुकसानीचा आढावा घेऊन ज्यांचे नुकसान झाले आहे अशांना तातडीने मदत करण्याचे…
मणिपूरमध्ये सुरक्षा दलाच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला – दोन जवान शहीद
इम्फाळ : मणिपूर राज्यातील विष्णूपूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर, तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना नांबोल सबल लेइकाई भागात सायंकाळी ६ वाजता घडली. आसाम रायफल्सचे जवान इम्फाळहून विष्णूपूरला निघाले होते. पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.प्रकरणाची…
भाजपाच्या संकल्प पत्रात घोषणांचा पाऊस शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना
मुंबई/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपले संकल्प पत्र म्हणजे जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे .या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस पडण्यात आला आहे .त्यामध्ये २०१७पर्यंत लखपती दीदी तयार करण्याची योजना आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत भावंतर योजना आणण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. प्रत्येक गरिबाला अन्नधान्याचे नियोजन व वृद्ध पेन्शन योजनेत दीड हजार वरून २१००…
शिवसेना खासदार भावना गवळी यांना ई डी चे समन्स
मुंबई/ शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना आर्थिक घोटाळ्या प्रकरणी ई डी ने समन्स जारी केले असून त्यांना ४ऑक्टोबर रोजी ई डी च्या कार्यालयात हजार राहण्यास सांगण्यात आले आहे या पूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक,संजय राऊत यांच्या पत्नी,अनिल परब,आनंदराव अडसूळ यांनी ई डी ने समन्स पाठवून त्यांची चौकशी केली होती . आता भावना गवली यांची…
