भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.इथे भलेही लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरीसुद्धा धर्मसंसद हा प्रकारच लोकशाही विरुद्ध आहे.बरे धर्म संसदेच्या माध्यमातून जर समाजासाठी,देशासाठी काही चांगले काम होणार असेल .आणि धर्मसंसदेतून समाजासाठी बंधुत्वाची भूमिका मांडली जाणार असेल तर ठीक होते.पण धर्मसंसदेचा वापर करून आपलाच हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी दुसऱ्याच्या धर्मावर टीका करणे त्यातून धार्मिक द्वेषभावना निर्माण करणे आणि देशासाठी रक्त संडणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची बदनामी करणे हे संतापजनक आहे .छतीस गड मधील रायपूर मध्ये भरलेल्या धर्म संसदेत कोण कुठला कलीचरण बाबा महात्मा गांधींवर टीका करतो काय तर म्हणे त्यांनी सरदार वल्लभ पटेल यांना पंतप्रधान व्हायला दिले नाही .पण हा कलीचरण बाबा जर संत असेल तर राजकारणाशी त्याचा काय संबंध आणि गांधीजी बद्दल बोलायची त्याची लायकी आहे का ? पण आजकाल काही प्रतिगामी लोकांनी गांधीजींना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे याचे उदातिकरण केले जात आहे वास्तविक केंद्राने हे सर्व थांबवायला हवे पण या देशाच्या दुर्दैवाने केंद्रात प्रतिगामी लोकांचे सरकार आहे त्यामुळे अशा बिनडोक बाबांचे प्रस्थ माजली त्यांना महत्व प्राप्त झालाय.
Similar Posts
कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची १०० कोटींची उधळपट्टी———पवई तलावाचे अनावश्यक सुशोभीकरण—खळबळजनक
कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची १०० कोटींची उधळपट्टीपवई तलावाचे अनावश्यक सुशोभीकरणमुंबई–(किसनराव जाधव) गेल्या वर्षभरापासून कोरोंनाचे संकट सुरू आहे कोरोंनाच्या या संकटाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसलाय मोठ्या प्रमाणात जीवित हानी तर झालीच पण अनेक ठिकाणी कोविड सेंटर उघडावे लागल्याने पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असे असताना केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी आणि त्यातून सत्ताधाऱ्यांना मिळणाऱ्या टक्केवारी साठी कोट्यवधीची…
म्हाडा कायद्यातील सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळावी यासाठी स्वाक्षरी मोहीम
मुंबई/ प्रत्येक पावसाळ्यात मुंबईत मोडकळीस आलेल्या कुठल्या ना कुठल्या इमारती कोसळून त्यात जीवित हनी होते त्यामुळे मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींना प्रश्न गंभीर बनला आहे मुंबईत मोडकळीस आलेल्या १५हजार उपकार प्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाच्या संदर्भात म्हाडा कायद्यात सुधारणा करणारे एक विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर केले होते .सादर विधेयक राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवलेले आहे मात्र…
आदित्यच्या खास अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरू- पालिका प्रशासनात सेनेच्या वर्चस्वाला सुरुंग
मुंबई / राज्यात सतातर होताच सुडाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. नव्या सरकार मधील नेत्यांनी शिवसेनेच्या वर्चस्वाखाली असलेल्या पालिकेतील अधिकाऱ्यांची जुण्यापदावरून उचलबांगडी करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदित्यच्या अगदी जवळचे अधिकारी अशी ओळख असलेल्या जी विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रंशात सकपाळ…
टी २० वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंचा विधान भवनात सत्कार
मुंबई : विश्वविजेत्या टीम इंडियाचा विधानभवनात सत्कार पार पडला. विधानभवनात विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा गौरव सोहळा पार पडला. टी20 विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडू कर्णधार रोहित शर्मा याच्यासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानभवनात पहिल्यांदाच अशा प्रकारचा सत्कार सोहळा पार पडला.रोहित शर्मा याने यावेळी मुंबईकर…
“हत्तीरोगाविरुध्द तळागाळात प्रबोधनाची गरज”
भारत सरकारने पोलिओ, एचआयव्ही एड्स तसेच देवी अशा विविध रोगांविरुद्ध अनेक दशके सर्वंकष उपायोजना करून त्याचे समूळ उच्चाटन केलेले आहे. मात्र त्याच वेळी आपल्या एकूण लोकसंख्येपैकी 51 टक्क्यांच्या जवळपास म्हणजे सुमारे 74 कोटी लोकांना हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलिरियासिस – एलएफ- Lymphatic Filariasis) होण्याचा गंभीर धोका असल्याचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. या आरोग्य विषयक गंभीर…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबई जनसत्ता न्यूज पोर्टलचे उध्दघाटन
मुंबई -प्रिट मीडिया मध्ये आपल्या धारदार लेखणीने गरीब,पिढीत आणि शोषितांना न्याय मिळवून देणार्या मुंबई जनसत्ताचे आता न्यूज पोर्टल ही सुरू झाले असून दिंनाक 28 जुलै 2021 संपादक किसन जाधव यांच्या हस्ते त्याचे उद्घघाटन झाले.यावेळी प्रसार माध्यमधील श्री बी.ए.जाधव, माजी पोलिस अधिकारी शिवाजी पोपळे, मेनेजर प्रविण शितोळे ,उद्योजक क्षेत्रातील अर्जुन गायकवाड,सत्तापा साळोखे आणि सामाजिक क्षेत्रातील चंद्रशेखर…
