मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतीय खलाशांना २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण आयकरात सूट मिळावी व नाविकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी प्राधान्याने कोटा मिळावा, या महत्त्वाच्या मागण्यांसाठी नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया या कामगार संघटनेचे सरचिटणीस व सह खजिनदार श्री. अब्दुल गणी सेरंग, उपाध्यक्ष मिलिंद कांदळगावकर व नुसीचे नवी दिल्लीतील प्रतिनिधी प्रकाश ठाकूर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन सर्व खलाशी कामगारांच्या वतींने मागण्यांचे निवेदन सादर केले. नुसीच्या कुशल व कामगार कल्याणकारी योजना आणि नुसीची १२५ वर्ष साजरी होणारी वैभवशाली कार्यपरंपरा राज्यपालांना आवडल्यामुळे त्यांनी दोन्ही मागण्या भारत सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यापुढे होणारी प्रगती नाविकांना कळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
Similar Posts
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीययुपी प्रमाणे मुंबईत कधी बुलडोझर फिरणार
मुंबई/ युपितील माफियांना अद्दल घडवण्यासाठी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर फिरवले त्यांची बेनामी संपती जप्त केली.आणि या कारवाईतून अतीक मोहंमद आणि राजा भय्या सारख्या कुख्यात माफियाही सुटले नाहीत. मग हे जर युपिमध्ये होऊ शकते तर मुंबईत का नाही मुंबईत बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि मदत करणारे , गुंड टोळ्या, सरकारी जागा हडप…
स्कूल बसच्या ३० टक्के भाडेवाढीमुळे पालक चिंतेत
मुंबई -डिझेल वाढलेले भाव आणि कामगारांची पगारवाढ यामुळे स्कूल बस व्यवसाय चालवणे अवघड झाले आहे त्यामुळे स्कूल बसच्या भाड्यात ३० टक्के वाढ केली जाणार आहे 24 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आता मुलांना शाळेत ने-आण करणाऱ्या स्कूल बस सुद्धा 10 फेब्रुवारी पासून पूर्णपणे सुरू होत आहेत. राज्य सरकारने स्कूल बसचा 2 वर्षचा रोड टॅक्स जरी…
उच्च न्यायालयाची भव्य अप्रतिम इमारत मुंबईत लवकरच उभारणार
देशात लोकशाहीचे पालन होते आहे किंवा नाही यावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अमृत मंथन होणे गरजेचे. खंडपीठाच्या भूमिपूजनाच्या वेळी मी नव्हतो पण झेंडा रोवायला मी आलो आहे. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात. पण मी एक गोष्ट अभिमानाने सांगतोय की, न्यायमूर्ती श्री दिपंकर दत्ता यांनी परवानगी दिली म्हणून मुंबई उच्च न्यायालयाची ब्रिटीशकालीन अप्रतिम इमारत हेरिटेज वॉकसाठी…
संजय राऊत यांची अखेर जामिनावर सुटका
मुंबई/ मनी लॉडरिंग प्रकरणात गेल्या 101 दिवसांपासून तुरुंगात असलेले शिवसेना नेते संजय राऊत याना अखेर आज पी आई ए एल न्यायालयाने 2 लाखांचा जामीन मंजूर केला आणि संजय राऊत यांची जवळपास तीन महिन्यांनी सुटका झाली.पी आय ए एल न्यायालयाचे न्यायमूर्ती देशपांडे यांच्या न्यायालयात राऊत यांच्या अर्जावर सुनावणी झाली .यावेळी न्या. देशपांडे यांनी ई डी ची…
भारतीय सेनेच्या त्या अनाम वीर सैनिकांना कडक सॅल्यूट…
१४ जानेवारी २०२३ चा दिवस होता. एकीकडे देश मकर संक्रांती साजरी करण्याची तयारी करत होता तर तिकडे मेघा इंजिनिअरिंग इंडस्ट्री लिमिटेडचे कामगार झोझीला बोगद्याचे काम करत होते. संध्याकाळी साधारण ५:४० च्या सुमारास अचानक हिमस्खलन झालं त्यासोबत तिकडे काम करणाऱ्या तब्बल १७२ कामगार त्यात अडकले. त्यांचा संपूर्ण जगाशी संपर्क तुटला. हे हिमस्खलन इतकं भीषण होतं की…
भाजप आमदाराची शेतकऱ्यांच्या सोबत पिठल भाताची पंगत – दिवाळी काळी
मुंबई/अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी आलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी पूर्णपणे कंगाल झालाय अशा स्थितीत सरकार कडूनही पुरेशी मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे .म्हणूनच शेतकऱ्यांच्या या वेदना सरकार समोर मांडण्यासाठी राज्यभर काळी दिवाळी केली .आज भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले तसेच रस्त्यात चुली पेटवून पीठल भात चटणी…
