मुंबई/ पालिका अधिकारी आणि फेरीवाल्यांचेेे साटेलोटे असतातच पण मुंबईतले फेरीवाले सुधा पालिका अधिकाऱ्यांचे इन्कम सोर्स बनले आहेत त्यामुळेच मुंबईतील अनेक रस्ते फेरीवाल्यांनी आपल्या नावावर केलेत पूर्वी फुटपाथ त्यांच्या नावावर असायच्या आता रस्तेही त्यांच्या मालकीचे झालेत आणि त्यामुळेच मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे काही दिवसांपूर्वी मुंबई जनसत्त्ता नळ बाजार मधील मंडई जवळचा रस्ता फेरीवाल्यांनी कसा व्यापला आहे याची माहिती दिली पण तिथे कारवाई करायची पालिकेची हिम्मत नाही बरे फेरीवाल्यांवर जी कारवाई होते ती कशी थातूर मातुर असते हे अनेक वेळा मुंबई कर जनतेने पाहिले आहे
नुकतीच कुलाब्यातील पालिकेच्या विभागाच्याव्पालिकेच्या अतिक्रमण विभागाने फुटपाथ वर बाजार मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई केली पण त्यांच्या स्तलच्या वरचे छप्पर हतबल अनधिकृत स्टॉल मात्र तसेच होते ते अतिक्रमण विभागाची पाठ फिरताच पुन्हा होते तसे झाले. अशा प्रकारच्या कारवाईमुळे फेरीवाले मुजोर झाले असून याच मुजोरीतून घोडबंदर येथे एका महिला पालिका अधिकाऱ्याला फेरीवाल्यांच्या हल्ल्यात बोटे गमवावी लागली होती तेंव्हा पालिका प्रशासनाने अशा प्रकारच्या कारवाईच्या देखाव्यातून मुंबईकरांची आणखी फसवणूक करू नये असे मुंबईकरांचे म्हणणे आहे
