मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाचे मुंबई महापालिका प्रशासनाने पालन करून करोना काळात मुंबईत झालेली ८४ हजाराहून अधिक बांधकामे तोडून टाकावीत आणि पालिका प्रशासनावर आपला वचक निर्माण करावा असे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. करोना काळात पालिका प्रशासन कोरॉनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्नात असतानाच काही भूमाफिया नी काही लाचखोर पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे केली . मात्र नागरिकांच्या तक्रारी येताच थातुर मतुर कारवाई करण्यात आली मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर करोना काळात झालेली बांधकामे तशीच आहेत आणि हीच अनधिकृत बांधकामे तोडण्याचा विरोधीपक्ष नेत्यांनी आग्रह धरला आहे .पण ही अनधिकृत बांधकामे स्थानिक नगरसेवकांना हाताशी धरून करण्यात आलेली असल्याने आणि यात काही पालिका अधिकाऱ्यांचेही खिसे गरम झालेले असल्याने मुख्यमंत्री संगीत की विरोधी पक्ष नेते संगीत कारवाई होणे कठीण आहे .
Similar Posts
पालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळेच कंत्राटदारांवर संक्रात
पालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळेच कंत्राटदारांवर संक्रातमुंबई/आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका असा मुंबई महापालिकेचा लौकिक आहे मात्र तो तसाच टिकवून ठेवण्यासाठी किंवा आणखी वादविणायसाठी प्रयत्न करण्याऐवजी पालिका प्रशासनाने असे काही निर्णय घेतले आहेत की ज्यामुळे पालिकेचे महसुली फायदा तर होणारच आहे पण कंत्राटदारांना हलक्या प्रतीची कामे करण्याची अप्रत्यक्ष मुभाही मिळणार आहेपालिका प्रशासनाने नुकताच एक जी आर…
दिशा सांलियन प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राणे पिता पुत्र अडचणीत-चंद्रकांतदादा सुधा रडारवर
मुंबई-शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोचला आहे कारण दिशा सालीयान प्रकरणात दिशाचे कुटुंबीय आणि महिला आयोगाच्या तक्रारीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .त्यामुळे राणे पिता पुत्रंच्या अडचणी वाढल्या आहेतसुशांत सिंग राजपूत यांची कथित सेक्रेटरी असलेल्या दिशेने 8…
राणे कंपनीला मोठा दणका – दिशा सलियान हीचा मृत्यु अपघातच सीबीआयचा अहवाल
दिल्ली/ दिशा सलीयान ही नशेमध्ये होती आणि त्यातच तिचा तोल गेला आणि ती 14 माळ्यावरून पडली असा अहवाल सीबीआयने दिला आहे . त्यामुळे दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घेणाऱ्या नारायण राणे पिता पुत्रांना मोठा दणका बसला आहे .सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या नंतर त्याची मॅनेजर असलेली दिशा सलियन हीचा एका पार्टी चां वेळी 14…
भिखार ..! अब्दुल सत्तरच्या राजीनाम्याची मागणी
सिल्लोड/ शिंदे शिवसेना पक्षातील फुटीर आमदार आणि सध्याचा कृषी मंत्री अब्दुल सत्तार याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अपशब्द म्हणताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे . राष्ट्रवादीने काल संपूर्ण महाराष्ट्रात सत्तार याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले .त्याच्या फोटोला जोडे मारून त्याचे पुतळे जाळले तसेच त्याच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील बंगल्यावर तुफान दगडफेक करून त्याच्या…
महाराष्ट्र | मुंबई | विश्लेषणपानिपतच्या पराभवाचा बदला
लाख मराठा सैन्य धारातीर्थी पडलेल्या पानिपतच्या युद्धातील पराभव मराठ्यांच्या जिव्हारी लागला होता. माधवराव पेशव्यांनी बदला घेण्यासाठी महादजी शिंदे,तुकोजी होळकर, विसाजीपंत बिनीवाले,रामचंद्र कानडे यांच्या फौजा दिल्लीवर हल्ला करण्यासाठी रवाना केल्या.मराठ्यांच्या फौजा त्वेषाने दिल्लीत शिरल्या.मराठ्यांनी दिसेल त्या अफगाण सैन्याला कापायला सुरुवात केली.मराठा फौजांनी लाल किल्याला वेढा दिला.आक्रमक मराठ्यांच्या पुढे अफगाण सैनिकांनी शरणागती पत्करली.मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभारत जोडो यात्रेत मिलिंद देवरा सहभागी
मुंबई/ सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात जी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे मोठा प्रतिसाद मिळत असून यात्रेत दक्षिण मुंबईचे माजी काँग्रेस खासदार मिलिंद देवरा आणि त्यांचे सहकारी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत .
