मुंबई/ महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेचा सरकारकडून पुन्हा एकदा खिसा कापण्यात आला असून पेट्रोल २९पैशांनी,डिझेल ३७ पैशांनी तर वीणा अनुदानित गॅस सिलेंडर १५ रुपयांनी महागले आहे विशेष म्हणजे डिझेल शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे कारण आता मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर ९९ रुपये १७ पैसे इतका झाला आहे त्यामुळे ट्रान्सपोर्टचा भाड्यात मोठी वाढ होऊन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे या दरवाढीबाबत लोकांनी तीव्र संताप व्यक्त करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
Similar Posts
हिंदी विरुद्ध मनसेची मराठी जागर परिषद
मुंबई/केंद्र सरकारने हिंदी भाषा शालेय शिक्षणात अनिवार्य केल्यामुळे मनसेने केंद्राच्या या निर्णयाच्या विरोध करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. दरम्यान हिंदी भाषेचा विरोध कायम ठेवून मनसेने आता मराठी जागर परिषद सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक भागात मराठीचा आग्रह धरला जाणार आहे. मराठीच्या व्याप्तीसाठी मराठी साहित्यिकांची मदत घेतली जाणार आहे .हिंदी विरुद्ध अशा तऱ्हेने…
संभाजी नगर दंगलीच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन
संभाजी नगर- संभाजी नगर मध्ये नुकतीच जी दंगल झाली होती त्याची चौकशी करण्यासाठी सरकारने एस आय टी स्थापन केली आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री शहरात दोन गटांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली होती. ज्यात मोठ्याप्रमाणात दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. तर या प्रकरणी पोलिसांनी 400 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हाही दाखल केला होता. दरम्यान…
दहीहंडी फोडताना ९५ गोविंदा जखमी दोघांचा मृत्यू
मुंबई/राज्यात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. खासकरून मुंबई आणि उपनगरांमध्ये दहीहंडीचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे. शेकडो गोविंदा पथकांनी दहीहंडी कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. मात्र या उत्सवाला गालबोट लागले आहे. आतापर्यंत मुंबईत 2 गोविंदांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक गोविंद जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुर आहेत. तसेच काही गोविंदांची…
अंधेरीत कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर बारवाल्याचा पोलिसांवर हल्ला
मुंबई: पुण्यात एकीकडे बार आणि पबमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणानंतर गोंधळ उडाला असताना दुसरीकडे आता मुंबईतही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं समोर आलं आहे. अंधेरी पश्चिमधील एका बारमध्ये हुक्का विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांना बार मॅनेंजरने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी त्या बार मॅनेंजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा…
मराठी माणसालाच मुंबईमधे उपाऱ्यासारखे राहावे लागते.. महाराष्ट्राच्या हितासाठी.. मुंबईमधे तिसऱ्या आघाडीची घोषणा
मुंबईसह महाराष्ट्रात परप्रांतीयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. उलट मराठी माणसालाच मुंबईमधे उपाऱ्यासारखे राहावे लागते आहे. या आणि अशा अनेक गोष्टी दररोज मोठ्या शहरी भागात घडत असताना आपण पाहतो. काही राजकीय पक्ष मराठी च्या आकसापोटी तर काही दिखाव्याच्या मराठी च्या प्रेमापोटी सोयीची भूमिका घेऊन प्रत्यक्षात राजकारण करत असतात. खर तर मराठी साठी अनेक वर्षांपासून अनेक वेगवेगळ्या…
सरकार असो की विरोधी पक्ष या लोकांना जनतेच्या प्रति त्यांची असलेली जबाबदारी कधी कळणार?
भारतीय लोकशाहीत आता सर्वसामान्य माणसाला फारशी किंमत राहिलेली नाही कारण राजकारण आणि राजकीय पक्ष याचे पूर्णपणे व्यावसायिकरण झालेले आहे त्यामुळे सामान्य माणूस केवळ निवडणुकीत मतदान करण्या पुरताच उरला आहे.लोकांच्या प्रश्नांची कुणाला काहीही पडलेली नाही आता हेच बघान राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला आहे त्यावर चर्चा करायची सोडून विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून…
