[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हे

सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथून अपहरण झालेल्या शाळकरी मुलाचा अमानुष खून मृतदेह सापडला,,, नरबळीचा संशय

कोल्हापूर,,, कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथून मंगळवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास आजोबाच्या घरातून अफरण करण्यात आलेल्या सात वर्षीय शाळकरी मुलाचा अनोळखी व्यक्तीने खून केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीला आल्याने कागल तालुकासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे वरद रवींद्र पाटील वय7 राहणार सोनाळी तालुका कागल असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे खंडनी वसुली की नरबळी मधून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा संशय आहे आजोबा दत्तात्रय शंकर महातूगडे राहणार सावर्डे बुद्रुक तालुका कागल यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सावर्डे बुद्रुक येथील गाव तलावात मुलाचा मृतदेह आढळून आल्याने घटनास्थळी नातेवाईकांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त पाचारण करण्यात आला आहे आजोबा दत्तात्रेय मातूगडे यांनी सावर्डे बुद्रुक येथे नवीन घर बांधले आहे घराच्या वास्तुशांती साठी डॉक्टर रवींद्र पाटील त्यांच्या पत्नी व मुलगा वरद सावर्डे बुद्रुक येथे गेले होते दिवसभर घरातील सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर वरद रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक पणे गायब झाला वडील आणि नातेवाईकांनी मुलाचा शोध घेतला पण वरद सापडला नाही मुरगुड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल झाला होता मुरगूड कागल पोलिसांनी शहरासह जिल्ह्यात व कर्नाटकातही मुलाचा शोध घेतला पण त्याचा छडा लागला नव्हता आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास मुलाचा मृतदेह गाव तलावात आढळून आला त्याच्या अंगावर जखमांचे व्रण आहेत त्यामुळे त्यामुळे अमानुष मारहाण करून मुलाचा खून करण्यात आला असावा तसेच यामागे नरबळीचा प्रकार असावा अशी शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे या प्रकारामुळे कागल तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे

error: Content is protected !!