भिवंडी दि 19 तालुक्यातील अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी फाटा या दरम्यानच्या राज्यमार्गाची खड्डयांमुळे दुरावस्था झाली असून या विरोधात स्थानिक नागरीकांच्या सर्वपक्षीय गाव विकास समितीच्या नेतृत्वाखाली मागील दोन वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा टोल वसुली बंद करा या साठी आंदोलन केली जात असताना स्थानिकांच्या रास्तारोको आंदोलना च्या एक दिवस आधी या रस्त्याची पाहणी मनसे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी करून टोल वसुली बंद करण्याचा इशारा दिला होता .त्यानुसार स्थानिकांचे रास्तारोको आंदोलन होताच दुसऱ्याच दिवशी अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मालोडी टोल नाका येथे धडक देत येथील टोल वसुली बंद करून रस्त्यावरील वाहनांना टोल न भारताचा जाऊ दिले .परंतु स्थानिकांच्या आंदोलच्या पार्श्वभूमीवर मनसेने वेगळे आंदोलन केल्याने हा सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरला आहे .यावेळी, प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे, भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील सह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..
Similar Posts
हैद्राबाद मधील दंगलखोरांवर कठोर कारवाई करणार/ गृहमंत्री
हैद्राबाद/ पैगंबरांच्या विषयी भाजपा आमदार टी राजा यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर जात्यांधनी हैद्राबाद मध्ये जो धुडगूस घातला त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे . चारमिनार भागातील सीसी टीव्ही फूटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत . त्यातून हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे . दरम्यान आता हे प्रकरण एन आय ए कडे देण्यात आले असून…
टिटवाळा लोकल रुळावरून घसरली
ठाणे – मुंब्रा रेल्वे स्थानकात टिटवाळा लोकलचा एक डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक एन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली होती. ४० मिनिटांहून अधिक हि लोकल मुंब्रा स्थानकात अडकून पडल्याने धीम्या डाऊन मार्गावर गाड्यांची रांग लागली होती.सीएसएमटी वरून टिटवाल्याकडे निघालेली एक लोकल रात्री साडेनऊच्या सुमारास मुंब्रा स्थानकात येताच मोटरमनच्या पहिल्या डब्याचे चाक रुळावरून घसरले आणि घडी प्लॅटफार्मला…
मंत्र्यांच्या बंगल्याना किल्ल्यांची नावे पण प्रत्यक्ष किल्ल्यावरच्या अतिक्रमणं आणि दुरवस्थेची काय?
मुबई/ महाराष्ट्रातले गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महान पराक्रमाचे आणि शिवशाहीच्या गौरवशाली इतिहासाची साक्षीदार आहेत पण पुरातत्व विभागाचा आडमुठेपणा आणि महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष यामुळे महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या ३०० किल्ल्यांची दुरवस्था झालेली आहे तर काही ठिकाणी मुस्लिमांनी अतिक्रमण करून थडगी बांधलेली आहेत तेंव्हा ही अतिक्रमणे काढून या किल्ल्यांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याचे सोडून सरकारने मंत्र्यांच्या…
राज्य सभेतील विरोधी पक्षाचे १२ खासदार निलंबित
दिल्ली/ शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर मागील पावसाळी अधिवेशनात सभागृहात गोंधळ घालणारे राज्य सभेतील विरोधी पक्षाच्या १२खासदारांना काल संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले यात काँग्रेस चे ६,शिवसेना आणि तृणमूलचे प्रत्येकी दोन तर दोन्ही कम्युनिस्ट पक्षाच्या प्रत्येकी एका खासदाराच्या समावेश आहेमागील अधिवेशनात या खासदारांनी सभापतींच्या कागद फेकले होते तसेच सभापतींच्या समोरील वेलं मध्ये उभे राहून घोषणाबाजी केली…
शिवसेनेच्या पालिकेतील ए टी एम मशीनवर आयकर विभागाच्या हातोडा-यशवंत जाधवच्या 40 मालमत्ता जप्त
मुंबई/ महापालिकेतील सतेच्या माध्यमातून मोठ मोठे झोल करणाऱ्या शिवसेना नेत्यांवर आता आयकर , ई डी सारख्या तपास यंत्रणांनी कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली असून काल आयकर विभागाने स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या 40 मालमत्ता जप्त केल्या आहेत त्यात वांद्रे येथील 25 कोटींच्या फ्लॅटचा सुधा समावेश आहेकाही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर…
शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा- गुगली काय ?
मुंबई- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्याचवेळी जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बड्या नेत्यांना अश्रूही रोखता आले नाहीत. त्याचवेळी दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर काहीवेळा…
