मुंबई/तुम्ही मुंबई लोकलने प्रवास करत असाल तर नक्कीच कधी ना कधी ‘बंगाली बाबा’ची जाहिरात पाहिली असेल. मुंबई लोकलमध्ये हामखास दिसणाऱ्या या जाहिरातींमध्ये आयुष्यातील कोणत्याही समस्यांवर या ‘बंगाली बाबा’कडे उपाय असल्याचा दावा केला जातो. मात्र आता या ‘बंगाली बाबा’ला भारतीय रेल्वेनं जन्माची अद्दल घडवली आहे.सामान्यपणे रेल्वेने प्रवास करताना अनेकदा डब्यांमध्ये चिकटवलेल्या ‘बंगाली बाबा’च्या जाहिराती तुम्हीही पाहिल्या असतील. या जाहिरातींमध्ये नोकरी, प्रेमविवाह, संमोहन, पती-पत्नीतील वाद, काळी जादू, शत्रूपासून मुक्तता, लॉटरी, न्यायालयीन खटले इत्यादी समस्यांवर “100% हमी” देत त्वरित उपायांचे आश्वासन देण्यात आल्याचं दिसतं.मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या संयुक्त कारवाईमध्ये ‘बंगाली बाबा’ला दणका दिला आहे. रेल्वे पोलीसांच्या पथकाने राबवलेल्या संयुक्त अभियानामध्ये रेल्वे डब्यांमध्ये स्टिकर चिटकविणाऱ्या ‘बंगाली बाबा’ला अटक केली आहे. रे रोड परिसरात मोहम्मद नझीर अंदारी नावाचा पी बंगाली बाबा म्हणून काम करत असल्याचे आ कळले. त्याआधारे दारुखाना येथील मीरा 1 अली दर्गा येथे संयुक्त छापा टाकत मंगळवारी ही कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्याकडून सुमारे 15 हजार छापील पोस्टर्स जप्त करण्यात आले. या जाहिरातींमध्ये दिलेल्या फोन नंबरवर कॉल्सच्या माध्यमातून पैसे उकळण्यात यायचे, अशी माहितीही समोर आली आहेचौकशीत आरोपी असलेल्या मोहम्मदने रेल्वे प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता व्यावसायिक हेतूंसाठी रेल्वे डबे व परिसराचा वापर करून जाहिरात साहित्य चिकटविल्याची कबुली दिली. त्यानुसार रेल्वे कायद्याच्या संबंधित कलमांखाली वडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद छापणे व – चिकटविणे यामध्ये इतर व्यक्तींचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पोलीस आता इतर संबंधितांचा शोध घेत आहेत.जाहिराती
पाहून त्यावर कॉल न करण्याचं आवाहन यंत्रणांकडून केलं जातं. या फोन कॉलच्या माध्यमातून समस्या सोडवण्याऐवजी फीच्या नावाखाली हजारो रुपये घेतले जातात. अशी अनेक प्रकरणं समोर आली असून खरोखरच काही समस्या असेल तर अधिकृतपणे यासंदर्भात शिक्षण घेतलेल्या सल्लागारांची प्रत्यक्षात जाऊन भेट घेण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हीसुद्धा अर भूलथापा देणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नका. अशा प्रकरणांमध्ये झालेल्या आर्थिक फसवणुकीमध्ये

