सातारा/ महाराष्ट्र आता महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही.कारण साताऱ्यात एका महिला डॉक्टरवर एका पोलिस अधिकाऱ्यानेच ४ वेळ बलात्कार केला.तर एका पोलिसांनी तिचा मानसिक छळ केला त्यामुळे या अन्याय पिढीत महिला डॉक्टरने आत्महत्या केली असून आपल्या हातावर तिने आत्महत्येचे कारण लिहिले आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.सर्वात संतापजनक बाबा म्हणजे हे प्रकरण बनण्यासाठी आता राजकीय दबाव येत असल्याचा आरोप त्या दुर्दैवी महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी केला आहे.
फलटण येथील रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरने रात्री आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीत रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. तर याप्रकरणी महिलेच्या काकांनी आणि आतेभावाकडून गंभीर आरोप केले जात आहेत. काकांच्या आरोपानुसार, ‘पुतणीवर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला जात होता, ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. डॉक्टरने आपल्या वरिष्ठांना आणि नातेवाईकांना वारंवार सांगितले होतं
की, तणावामुळे माझं आयुष्य संपवावं लागेल,’ असं त्यांनी म्हटलं आहे. तर आतेभावाने महिलेला फोन करणारे फलटण भागातील खासदार होते, असा आरोप केलाय
महिला डॉक्टरचे आतेभाऊ म्हणाले की, ‘फक्त खासदार इतकाच उल्लेख आहे. नाव कोणाचेही नाही खासदारांच्या पीएने खासदारांना फोन लावून दिला आणि त्यानंतर बहीण त्यांच्याशी बोलली होती. हे खासदार फलटण भागातील आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता. याबाबत बहिणीशी चर्चा झालेली नाही. बहिणीची दुसरी चुलत बहीण मेडिकल ऑफिसर आहे तिला काही दिवसांपूर्वी तिने दबाव येत असल्याबाबत सांगितलं होतं. त्यानंतर आत्महत्या केल्यानंतरच आम्हाला समजलं. बहिणीने दोन-तीन महिन्याआधी तक्रार देऊन देखील त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही’, असा आरोप त्यांनी केलाय.सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर ने पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमुळे समोर आले आहे. तसेच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. सद्यस्थितीत याप्रकरणी फलटण सिटी पोलीसमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (२) (एन), १०८प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यासाठी शोधपथक रवाना करण्यात आले आहे. मयत डॉक्टर यांचे शव विच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. फरार आरोपींचा तातडीने शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाने पोलीस अधीक्षक, सातारा यांना दिले आहेत. पीडित महिलेने याआधी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रारकेली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत.

