- गोवंडींत २० बेनामी फ्लॅट,!३०० चेले, बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
- मुंबई/बनावट कागदपत्रांच्या आधारे गेली 30 वर्ष मुंबईच्या गोवंडी भागात राहणाऱ्या आणि बांगलादेशातून अनेक तृतीयपंथीयांना बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत आणणाऱ्या, गुरुमा ज्योती उर्फ बाबू खान या तृतीयपंथीयाच्या अटकेनंतर, आता बऱ्याच गोष्टी उघडकीस येत आहेत. या तृतीय पंथीयाचे मुंबईच्या गोवंडी भागात 20 बेनामी फ्लॅट असून, गोवंडी देवनार मानखुर्द परिसरात त्याचे तीनशे तृतीयपंथी चेले आहेत.
- तृतीयपंथी बाबू खानच्या अटकेनंतर, तो तीस वर्ष मुंबईमध्ये कसा राहत होता? आणि त्याला निवासाचे बनावट कागदपत्र कोणी दिली? याची आता चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान बाबू खानला बनावट कागदपत्र देणाऱ्या, तसेच त्यांनी हडप केलेल्या जागे बाबत त्याच्यावर कोणतीही कारवाई न करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात गेल्या 30 वर्षापासून जे जे पालिका अधिकारी कार्यरत होते, त्यांच्या वर आता चौकशीची टांगती तलवार आहे. त्याचबरोबर बाबू खान गेल्या 30 वर्षापासून काही देश विघातक कार्यामध्ये सक्रिय होता का ?याचीही आता चौकशी केली जात आहे. केवळ बाबू खान चीच नव्हे, तर त्याच्या 300 चेल्यांची ही चौकशी होणार असल्याचे समजते. कारण हे सर्व बांगलादेशी आहेत. आणि इथे कोणत्या पुराव्याच्या आधारे राहत होते याची चौकशी होणार आहे. तसेच त्यांच्याकडची कागदपत्रे तपासली जाणार आहेत. बाबू खानचे गोवंडी मानखुद कुर्ला देवनार अगदी वाशी पर्यंत मोठे नेटवर्क होते. बाबू खानच्या टोळीतील काही तृतीयपंथी देह व्यापार करायचे असेही उघडकीस आल्याचे समजते.
