ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मीच नव्हे संपूर्ण देश तुमच्यावर हसतोय! पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल


नवी दिल्ली/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील संसदेत सुरु असलेल्या चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आहे. काँग्रेसला केवळ विरोधाचा बहाणा हवा आहे. आमच्या सैन्याने पाकिस्तानला जन्माचा धडा शिकवला आहे. एकीकडे साऱ्या जगाने भारताची ताकद पाहिली आणि काँग्रेस त्यातही खुचपटं काढत भारतीय सैन्यांचे मनोबल कमी करीत पाकिस्तानची भाषा बोलत आहेत अशीही टीका पंतप्रधानांनी केली आहे.
आधीही भारताने सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा ही हल्ला झाल्याचे काही पुरावेच नाहीत असा आरोप काँग्रेसवाले करीत होते. नंतर एअर स्ट्राईक झाला तेव्हाही त्यांनी यांना काही जमले नाही असा आरोप केला. आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बदला घेतला तर हे म्हणत आहेत युद्ध का थांबवले असा सवाल काँग्रेसवाले करीत आहेत. वाह रे बयान बहादुरो… तुम्हाला विरोधाचा काही ना काही बहाना पाहिजे. मीच नाही तर संपूर्ण देश तुमच्यावर हसत आहे. सैन्याच्या प्रती निगेटिव्हिटी आहे. ही काँग्रेसची जुनी सवय आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झोंबरी टीका केली आहे.
आपण एअर स्ट्राईक केला तेव्हा आपण एक जवान शत्रू मुलखात अडकला. त्यावेळी विरोधक आता तर मोदी फसले. आता कसे आणणार परत असे म्हणजे मनात खुष झाले होते. आम्ही अभिनंदन यांना परत घेऊन आलो. तेव्हा त्यांची बोलती बंद झाली. त्यांना वाटलं हा नशिबवान माणूस आहे. आपल्या हातातलं हत्यार गेलं. आणि त्यांच्या इको सिस्टिमने सोशल मीडियात बऱ्याच कहाण्या रचल्या. पण बीएसएफचा जवानही भारतात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

error: Content is protected !!