ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मराठी एकजुटीचा दणक्यानंतर पोलिसांची मोर्चाला परवानगी मीरारोडमधे मराठ्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन


मीरा रोड/मराठीच्या विरोधात काढलेल्या मोर्चाला संरक्षण देणाऱ्या पोलिसांनी, मराठ्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करताच, संतप्त झालेला मराठी माणूस रस्त्यावर उतरला. इतकेच नव्हे तर मुंबईसह आसपासच्या शहरांमधील सर्व मराठी मीरारोडच्या दिशेने निघाले होते त्यामुळे घाबरलेल्या सरकारने अखेर मोर्चाला परवानगी दिली.मराठी माणसांच्या एकजुटीसमोर फडणवीस सरकारला दुसऱ्यांदा गुडगे टेकावे लागले.तर मराठ्यांच्या या अभूतपूर्व शक्तिप्रदर्शनाचा, मराठी विरुद्ध मुजोरी करणाऱ्या गुजराती मारवाड्यानीही चांगलाच धसका घेतला आहे.
हिंदी भाषेच्या सक्ती वरुण झालेल्या वादात, मीरा भाईंदर मध्ये काही दिवसांपूर्वी गुजराती मारवाडी व्यापाऱ्यांनी बंद पुकारून,, मनसे विरुद्ध मोर्चा काढला होता.त्यामुळे मराठी माणसांनी मंगळवारी मीरा रोडमध्ये मोर्चाची हाक दिली होती.त्यानंतर पोलिसांनी मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा पाठवल्या होत्या.तसेच पहाटे 3 वाजता मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले .तर सकाळी ७ वाजल्यापासून मराठी नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली.तरीही मराठी माणूस मोर्चासाठी मीरारोड मध्ये एकवटला. पण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने घोषणाबाजी सुरू झाली. मराठी द्वेष्टा स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरुद्ध घोषणा दिल्या जात होत्या.यावेळी मराठी महिलाही मोठ्या संख्येने हजर होत्या.बालाजी चौक ते मीरारोड रेल्वे स्थानक दरम्यान मोर्चाचा मार्ग होता .पण पोलिसांनी रूट बदलायला सांगितला. मात्र कार्यकर्ते तयार नव्हते.गुजराती व्यापाऱ्यांना मोर्चा काढू दिलात मग आम्हाला परवानगी का नाही? असा सवाल करीत होते.त्यामुळे मीरारोडच्या रस्त्यावर मराठी माणसाचा प्रक्षोभ सुरू झाला.त्यातच इतर ठिकाणाहून मराठी लोक मीरारोडकडे येत असल्याचे समजताच, पोलिस आणि सरकारचे धाबे दणाणले. अखेर अगोदर ठरलेल्या मार्गानेच मोर्चाला परवानगी देण्यात आली. तसेच अविनाश जाधव आणि अटक केलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.त्यामुळे अविनाश जाधव,नितीन सरदेसाई,संदीप देशपांडे आदी मनसेचे नेते तसेच ठाकरेंच्या सेनेचे राजन विचारे,विनोद घोसाळकर आणि इतर कार्यकर्ते मीरा रोड स्थानक जवळच्या मेजर स्वप्नील राणे चौकात जमले.या ठिकाणी मोर्चेकरी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी मोर्चाला परवानगी नाकारणाऱ्या सरकारवर सर्वच नेत्यांनी जोरदार टीका केली. मात्र पोलिसांच्या दंडेली नंतरही मोर्चा यशस्वी झाला. दरम्यान मोर्चाला परवानगी नाकारल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करीत. पोलिस महासंचालकांकडे अहवाल मागितला आहे.या मोर्चाने पुन्हा एकदा सरकारला मराठी माणसांची ताकत बघायला मिळाली.
आपणही मराठी असल्याचा दावा करीत, मोर्चात सहभागी झालेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मोर्चात येताच, वातावरण चिघळले. मोर्चातील लोकांनी गो बॅक सरनाईक,५० खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या. तर कोणीतरी त्यांच्यावर बाटली फेकली. त्यामुळे घाबरलेल्या सरनाईकांना काढता पाय घ्यावा लागला. मोर्च्यातल्या लोकांनी त्यांना अक्षरश पळवून लावले.

error: Content is protected !!