पाकिस्तानच्या हल्ल्यांवर भारताचे प्रतिहल्ले सुरूच – सीमा वरती शहरांमध्ये ब्लॅकआऊट
४०० ड्रोन च्या साह्याने भारतावर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला
नवी दिल्ली/ भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतर ,गुरुवार पहाटे पासून पाकिस्तानने तुर्कीने दिलेल्या ४०० ड्रोन द्वारे भारतातील ३६ ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे हल्ले परतवून लावले. यात पाकिस्तानचे १०० हून अधिक ड्रॉन तसेच ३ लढाऊ विमाने नष्ट करण्यात आली. त्यामुळे आता पाकिस्तानने भारतातील नागरी वस्त्यांना टार्गेट करायला सुरुवात केली असून, पुछ पासून भुज पर्यंतच्या सीमावर्ती भागावर हल्ले करायला सुरुवात केली आहे. त्याला भारतीय सेना सडेतोड उत्तर देत आहे.दरम्यान आज आज भारतीय सेनादलाच्या तिन्ही प्रमुखांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन युद्धाची माहिती दिली त्याचबरोबर संरक्षणमंत्री,गृहमंत्री, एन एस एफ यांच्याही बैठका झाल्या. दरम्यान सर्व सीमावर्ती शहरांमध्ये ब्लॅक आउटचे आदेश देण्यात आलेत.
परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत, माहिती देताना लष्कराच्या प्रवक्त्या कर्नल सोफिया अन्सारी यांनी सांगितले की ८/९ मे च्या मध्यरात्री, पाकिस्तानी सैन्याने भारतीय युद्धक्षेत्रात अनेक हल्ले केले, लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. आंतरराष्ट्रीय सीमेवर ३६ ठिकाणी घुसखोरीचे प्रयत्न झाले. सुमारे ३००-४०० ड्रोन वापरले गेले. त्याचा उद्देश गुप्तचर यंत्रणा आणि हवाई संरक्षण प्रणालींबद्दल माहिती गोळा करणे होता. प्राथमिक तपासात हे ड्रोन तुर्कीचे असल्याचे समोर आले. याची चौकशी केली जात आहे. हे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले. एक यू ए व्हि देखील हालचाल करत होते, जे निष्क्रिय करण्यात आले होते.
पाकने नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला, ज्यामध्ये काही सैनिक जखमी झाले. ७ मे २०२५ रोजी रात्री ८:३० वाजता क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला करण्यात आला आणि त्या काळात भारताने आपले हवाई क्षेत्र बंद केले नाही. नागरिकांना ढाल म्हणून वापरले.पंजाब सेक्टरमध्ये हाय एअर डिफेन्स अलर्ट दरम्यान, आमचे हवाई क्षेत्र नागरी उड्डाणांसाठी बंद होते, परंतु एक नागरी उड्डाण पाकिस्तानच्या हद्दीवरून चालत होते. पाकिस्तानच्या नागरी विमानाने दमासहून लाहोरला उड्डाण केले. भारतीय हवाई दलाने संयम दाखवून प्रतिसाद दिला आणि आंतरराष्ट्रीय नागरी हवाई सेवांची सुरक्षा सुनिश्चित केली. पाकिस्तानच्या यूएव्हीने भटिंडा आर्मी स्टेशनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, पण आम्ही तो हाणून पाडला असेही सोफिया यांनी सांगितले
दरम्यान पाकिस्तानच्या संसदेत आज सत्ताधारी पक्षाच्या एका सदस्याने, पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची खिल्ली उडवताना ,आमचे पंतप्रधान मोदींचे नाव घ्यायलाही घाबरतात .तर पाकच्या एका संसद सदस्याला भाषण करताना रडू कोसळले त्यानेही पंतप्रधान शहाबाज यांच्यावर टीका केली.
आयपीएल स्थगित
भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्याने भारताने २७ विमानतळ बंद केले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू असलेल्या आय पी एल सामन्यांसाठी खेळाडूंना विमानाने प्रवास करता येणार नाही .त्याचबरोबर या स्पर्धेत सहभागी असलेल्या खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने, सध्या सुरू असलेली आय पी एल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.
