ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

नाव आणि धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्या जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला – २७ ठार ५० जखमी


श्रीनगर/काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे .पहेलगाव येथे ४ दहशतवाद्यांनी पर्यटकांवर नाव आणि धर्म विचारून केलेल्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला तर ५० पर्यटक जखमी झाले.
जम्मू काश्मीरमध्ये लोकनियुक्त सरकार आल्यापासून तिथे वातावरण काहीसे शांत होते .त्यामुळे यंदाच्या वेकेशन पिरेड मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढत आहे. सध्या मोठ्या संख्येने सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक काश्मीरमध्ये गेले आहेत. परंतु आजही काश्मीरमधील जनता असो, की बाहेरून येणारे पर्यटक असो त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पूर्वी इतकाच गंभीर बनलेला आहे. दुपारी अडीच वाजता पहलगाम पासून सहा किलोमीटर दूर असलेल्या बैसरन भागात, काही पर्यटक हॉर्स रायडिंगचा आनंद लुटत असतानाच, त्या ठिकाणी आलेल्या तीन आतंकवाद्यांनी या पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारून गोळ्या घालायला सुरुवात केली. यामध्ये २७पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला तर ५०पर्यटक जखमी झाले आहेत. त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमी पर्यटकांना सुरुवातीला पहेलगाम येथील आणि नंतर श्रीनगरच्या रुग्णालयात उपच्चारर्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजतात लष्कर आणि पोलिसांनी या संपूर्ण परिसराला घेरले आणि शोध मोहीम सुरू केली .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या घटनेची माहिती समजतात, त्यांनी तात्काळ गृहमंत्री अमित शहाणा फोन करून काश्मीरला जायला सांगितले. त्यानुसार सायंकाळी अमित शहा एका विशेष विमानाने काश्मीरला पोहोचले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी आणि गुप्तचर संघटनांच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या घटनेला जबाबदार असलेल्या कुणालाही आम्ही सोडणार नाही असे अमित शहा यांनी सांगितले .दरम्यान या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टेट्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने घेतली असून, ही संघटना लष्कर ए तोयबाची एक शाखा असल्याचे सांगितले जात आहे .सध्या लष्कर आणि पोलीस या संपूर्ण परिसरात कोबिंग ऑपरेशन करीत आहेत. पर्यटकांवर गोळीबार करणारे अतिरेकी याच परिसरात लपले असण्याची शक्यता लष्करी अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे सर्च ऑपरेशन सुरू आहे. मात्र या घटनेने संपूर्ण जम्मू काश्मीर राज्य हादरून गेले आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!