[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेत महिलांची अडवणूक करणाऱ्यांवरकठोर कारवाई करणार- मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना तंबी

मुंबई – लाडकी बहिण योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे, फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही यादृष्टीने चोख नियोजन करावे. लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाहीयाची काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा राज्यात मोठा गाजावाजा झाला. अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरवात केली आहे. मात्र, तितक्याच मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट सुरु झाला आहे. काही अधिकारी वर्ग अर्ज दाखल करून घेण्यास नकार देत आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी बहिण योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे, फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करत असल्याचे निदर्शनास आल्यास असे अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
लाडकी बहिण योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलदगतीने होईल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत

error: Content is protected !!