मुंबई महानगरपालिका शूटिंगबॉल संघाने पटकावले अंतिम विजेते पद
ए वन संघ माणकुले ता. अलिबाग जि. रायगड आयोजित निमंत्रितांच्या राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा दि. ५ मार्च २०२३ रोजी दिवस/रात्र विद्युत झोतात कै. विश्वास शंकर पाटील क्रीडानगरी माणकुले येथे पार पडल्या. सदर स्पर्धेत राज्यातील बलाढय अशा २० संघांना निमंत्रित करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिका शूटिंगबॉल संघाने साखळी सामान्य मध्ये विजयी घोडदौड करत उपांत्य फेरीत मजल मारली…
