झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवण्याची राज्यपालांची बांधकाम व्यावसायिकांना सूचना: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन आगामी २ – ३ वर्षांमध्ये मुंबईत कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही, या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बांधकाम व्यावसायिकांना केले. सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी आपला…
