लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही! मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
अकोला/राज्यातील विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा करिश्मा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या प्रचार सभांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेबाबतचं आश्वासन देत आहेत. काहीही झालं तरी ही योजना बंद पडणार नाही, असं ते ठासून सांगत आहेत. तसेच, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच आमचं सरकार आल्याचेही ही मंडळी सांगते. कालच…
