महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी चुकीचे राजकारण करत असतील तर ते देखील सहन करणार नाही
सातारा/महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव आले आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळबळ माजली असताना रविवारी फलटणच्या मधुदीप हॉटेलसमोरील मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात…
