अस्वस्थ प्रजासत्ताक- बदलाव से दुनिया चांद पर पहुंची फिरभी परिवर्तन को नकारते है हम! धरम करम जात पात की घटिया सोच से कब आजाद होंगे बोलो हम!!
आज भारताचा प्रजासत्ताक दिन ! दरवर्षी प्रमाणे केवळ एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली तरी जात पात धर्म कर्मकांड यातून काही मुक्ती मिळालेली नाही आजही या देशात अन्न ,वस्त्र ,निवारा, पाणी ,वीज रस्ते यासारख्या मूलभूत गरजांसाठी लोकांना आंदोलने करावी लागतात.विकास फक्त कागदावर दिसतो .लोकसंख्या वाढतेय…
