शिवाजी महाराजांची एकनाथ शिंदे बरोबर तुलना करणाऱ्या लोढा शेठ विरुद्ध संताप
मुंबई / प्रताप गडावरील शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केल्यामुळे पर्यटन मंत्री लोढा शेठ यांच्या विरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसने लोढाच्या विरोधात आंदोलन करून त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात बोलताना लोढा आहेत यांनी सांगितले की औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पकडल्यावर…
