डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांची जागा हडप करून भूमाफियांनी बांधली बेकायदेशीर इमारत
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६५बेकायदा इमारतींचा मुद्दा ऐरणीवर असतानाच भूमाफियांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. डोंबिवली जवळील दावडी परिसरात भूमाफियांनी चक्क घटनेचे शिल्पकार डॉ. पाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावावर असलेल्या भूखंडावर अतिक्रमण करत टोलेजंग इमारत उभारली आहे.कल्याण डोंबिवलीमधील बेकायदा बांधकामांचा प्रश्न जटिल आहे. भूमाफियांनी पालिकेचे बनावट कागदपत्रे बनवून रेरा घोटाळा केल्याचे प्रकरण…
