यापुढे मोगलांचा इतिहास शिकवला जाणार नाही/ देवेंद्र फडणवीस – देशभर शिवजयंती उत्साहात साजरी
आग्रा/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आता एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला २० पाने मिळाली आहेत, येथून पुढे मोगलांचा इतिहास शिकवला जाणार नाही असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.ज्याजागेवर छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केले होते. त्या ठिकाणाहून शिवाजी महाराज यांनी स्वत:ची गनिमीकाव्याने सुटका करुन घेतली. त्या जागेवर स्मारक बांधण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली…
