गिरणी कामगारांच्या घरांच्या नावाखाली ३ कोटी ६० लाखांची फसवणूक; ७ जणांवर गुन्हा दाखल
मुंबईत गिरणी कामगारांसाठी म्हाडाद्वारे दादर आणि नायगाव परिसरात बांधलेली घरे स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल माने, संतोष टकले, विलास भालेराव, सिद्धेश जाधव, नीलेश खाडे, सुधीर वायंगणकर आणि शीला धुरी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे…
