लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला- विरोधकांचा आरोप
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महायुती सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च होत होत आहेत. महायुती सरकारने या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केले होते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याबद्दलची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास…
