पंढरीची वारी……शामसुंदर महाराज सोन्नर
सोपी विवेकी पायवाट……………………………….या रे नाचू प्रेमानंदे lविठ्ठल नामाचिया छंदे lअशी साद वारक-यांनी एकमेकांना घातली आहेत. मग विचारांचा जागर मांडत किचकट कर्मकांडाना अलगद बाजूला सारून विवेकाच्या वाटेवरील निरंतर चालण्याची दिशा दाखविली जात आहे.संत परंपरेपूर्वी समाज किचकट कर्मकांडामध्ये रुतला होता. त्या दलदलीत तो अधिकाधिक रुतत जाईल अशी ग्रंथ रचना केली जात होती. रामदेवराय यांचा प्रधान हेमाद्रीपंत याने…
