मुंबई/महाराष्ट्रात भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्यामुळे व शिवसेने पाठोपाठ फडणवीस आणि राष्ट्रवादी फोडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र खवळला आहे अशा स्थितीत ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे अशी मागणी महाराष्ट्रातील आणि खास करून मुंबईतील जनतेने केलेली आहे. मनसे आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांच्या सुद्धा हेच मत आहे राज ठाकरे यांनी मात्र या प्रश्नावर बोलताना मी माझी भूमिका माझ्या मेळाव्यातून जाहीर करीन असे सांगितले आहे तसेच राष्ट्रवादीतील बंडा मागे स्वतः शरद पवार हेच आहेत असेही राज ठाकरे यांनी सांगितले आहे. कारण शरद पवारांचे जे विश्वासू लोक आहेत ते राष्ट्रवादी सोडून जाऊ शकत नव्हते यामध्ये प्रफुल्ल पटेल दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांचा समावेश आहे. हे लोक ज्या आर्थिक फुटले त्याआधी या फुटी मागे शरद पवार यांचाच हात असल्याचा अंदाज राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे
राष्ट्रवादीतील फुटी नंतर शिवसेना भवन जवळ एक बॅनर लागलेले आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे या बॅनरची आज दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू होती मात्र जनतेची ही भावना ठाकरे बंधू समजून घेतील का हाच खरा प्रश्न आहे कारण उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत महाआघाडीमध्ये आहे तर राज ठाकरे हे फडणवीस आणि शिंदे यांच्या बरोबर आहे अशा परिस्थितीत ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. परंतु जर काही किमया साधली गेली तर मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला दहा जागाही मिळणार नाही आणि भाजपची सगळे मनसुबे उधळले जातील असे मुंबईतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसांचे मत आहे
