ठाणे / ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे
मनीषा कायदे या भाजपतून शिवसेनेत गेल्या होत्या त्यामुळे ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेवर पाठवले होते. मात्र हल्ली त्या पक्षात नाराज होत्या कारण सुषमा अंधारे शिवसेनेत गेल्यापासून मनीषा कायदे यांचे महत्व कमी झाले होते म्हणून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला पक्ष सोडताना त्यांनी पक्षप्रमुख उढव ठाकरे यांच्यावर टीका केली .पक्षप्रमुख कोणाचे ऐकत नाहीत, बोलायला देत नाहीत अशा प्रकारचे त्यांनी आरोप केले तर शिंदेंची मात्र स्तुती केली
Similar Posts
अक्षय शिंदेंचे एन्काउंटर संशयास्पद – न्यायालयाने ५ पोलिसांना दोषी ठरवले
मुंबई – अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे. पाच पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने बंद लिफाफ्यातून चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. फॉरेन्सिकच्या अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिन्टस…
मनसेच्या संतोष धुरी यांना तिकीट मिळवण्यात अपयश – वार्ड क्रमांक १९४ मध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने
मुंबई/शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर सर्वाधिक संघर्ष पाहायला मिळालेल्या प्रभादेवी-दादर भागातील वॉर्ड क्रमांक १९४ मधील लढाई अखेर ठरली आहे. ठाकरे बंधूंमध्ये या वॉर्डसाठी दोघांच्या निष्ठावंत सैनिकांमध्ये चढाओढ सुरु होती. मनसेचे संतोष धुरी आणि उद्धव ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे या वॉर्डसाठी इच्छुक होते. अखेर हा प्रभाग शिवसेनेला सुटला असून, प्रभाग क्रमांक 194 मधून निशिकांत शिंदे…
बॉलिवूड मधील मोगली भाईजान
सध्या इतिहासाची परिभाषा आपापल्या सोयीनुसार निश्चित करण्याची चढाओढ लागली आहे.इतिहास बदलता येत नाही पण त्याचे विद्रुपीकरण करता येते.हे आजवर समाजाने पाहिलेले आहे.आणि यात अनेक विचारवंत आणि इतिहासाचे अभ्यासक अग्रेसर आहेत.पण धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी अल्पसंख्यांकांना चुचकारणे ही सुधा काळाची गरज बनली आहे. त्यासाठी अल्पसंख्यांक समाजाची बाजू घेऊन जो भारता विरुद्ध बोलेल तो खरा विचारवंत! अशी या…
आता नवाब मलिखही ई डी च्या जाळ्यात – वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी ७ ठिकाणी छापे
पुणे/ रोज उठून पत्रकार परिषद घेणारे आणि कोणावर ना कोणावर आरोपांची चिखलफेक करणारे राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री हे सुधा आता ई डी चां चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील हिंजवडी येथे असलेल्या वक्फ बोर्डाच्या ६हेक्टर जमिनीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे .बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन वक्फ बोर्डाची नाही असे दाखवून ती बिल्डरांना…
लोकांना सेवा देण्यात महसूल विभाग राज्यात सर्वोत्कृष्ट !
मुंबई : राज्यातील जनतेला देण्यात येणाऱ्या प्रशासकीय सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘गव्हर्नन्स प्रोसेसिंग री-इंजिनिअरिंग’ (GPR) फेज-२ च्या आढावा बैठकीत महसूल विभागाने राज्यात अव्वल दर्जा पटकावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला, ज्यामध्ये महसूल विभागाच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी विभागाचे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे…
मुंबईत गृहनिर्माण सहकारी संस्थांची-१३ व १४ मे रोजी भव्य परिषद होणार
मुंबई- मुंबई जिल्हा हौसिंग फेडरेशन आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मुंबईत पहिल्यांदाच भव्य अशा गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या दोन दिवसांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १३ मे आणि रविवार १४ मे रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर ही परिषद संपन्न होणार आहे, अशी माहिती भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण…
