३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यामुळे शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील निकटचे सहकारी एकनाथ संभाजी शिंदे यांनी सुमारे ४० आमदार व १० खासदार यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाबरोबर घरोबा केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार होत महाविकास आघाडीची अडीच वर्षाची राजवट संपुष्टात आली. या घटनेच्या बरोबर एक वर्षानंतर अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ ची पुनरावृत्ती करीत पाच वर्षाच्या एका कार्यकाळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार यांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा अत्राम, अनिल पाटील, अदिती तटकरे, संजय बनसोडे या आपल्या सहकाऱ्यांनाही शिंदे फडणवीस सरकार मध्ये सहभागी करुन घेत आणखी एकदा राजकीय भूकंप घडवून आणला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आपल्याला दुहीचा शाप भोवला असल्याचे इतिहासातील पानांवर नजर टाकल्यास दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन मोहिमा फत्ते करीत असतांना महाराजांनाही काही मराठ्यांच्या गद्दारीचा सामना करावा लागला होता. १९५६ साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून आंदोलन झाले. मुंबई प्रांत, बॉम्बे प्रोविन्स चे परिवर्तन केंद्र सरकारकडून मुंबई द्विभाषिक राज्यात करण्यात आले आणि मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा डाव खेळण्यात आला. म्हणून आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, श्रीधर महादेव तथा एसेम जोशी, पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, शाहीर अमर शेख आदींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली. १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र समितीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळून सत्ता समितीच्या हातात येणार त्याचवेळी यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांनी एका बाजूला शेतकरी कामगार पक्षातून यशवंतराव मोहिते आणि शंकरराव मोहिते पाटील यांना कॉंग्रेसमध्ये आणले. महाराष्ट्रात पक्ष फोडण्याची सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नजरेतून उतरु नये आणि काँग्रेसच्या हाती सत्ता यावी म्हणून काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या विदर्भाला महाराष्ट्रात आणण्यासाठी डाव टाकला, त्यात ते यशस्वी सुद्धा झाले. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या हातून सत्ता यशवंतरावांनी जवळपास हिसकावून घेतली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश १ मे १९६० रोजी आणला. परंतु शंकरराव चव्हाण यांनी सचिवालयाचे मंत्रालय करण्यासाठी निर्णय घेण्याआधी या मंगल कलषाऐवजी सहाव्या मजल्यावर पंडित जवाहरलाल नेहरु यांचा अस्थिकलष ठेवण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण हे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकारमध्ये नोव्हेंबर १९६२ मध्ये संरक्षण मंत्री म्हणून रुजू झाले तेंव्हा विधानपरिषदेच्या सभागृहात ग. दि. माडगूळकर यांनी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असे वर्णन यशवंतराव चव्हाण यांच्या अभिनंदनपर ठरावाच्या भाषणात केले. ग. दि. मां. चे हे वर्णन अजरामर झाले. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे ताश्कंद दौऱ्यावर असतांना यशवंतराव चव्हाण त्यांच्या समवेत होते. दुर्दैवाने लालबहादूर शास्त्री यांचे देहावसान झाले. त्यानंतर कामराज, निजलिंगप्पा आदी काँग्रेस नेत्यांनी पुढचे पंतप्रधान हे यशवंतराव बळवंतराव चव्हाण हेच असतील असा ठराव करुनही अपेक्षेपेक्षा ही विनम्रता दर्शविणाऱ्या यशवंतरावांनी त्यांच्या हातातोंडाशी आलेले पंतप्रधानपद दिल्लीच्या चरणी म्हणजेच इंदिरा गांधी यांच्या हाती सुपूर्द केले. मराठी माणूस तिथेच मागे पडला. १९६९ साली बंगळुरुच्या काचघरात काँग्रेस पक्ष फुटला आणि इंदिराजींची इंडिकेट तर मुरारजींची सिंडिकेट अशी काँग्रेसची दोन शकले झाली. पण १९७१ सालच्या बांगलादेश निर्मिती नंतर इंदिरा गांधी अनभिषिक्त सम्राज्ञी बनल्या आणि सत्ताभिलाषी इंदिराजींनी आणीबाणी लादली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांती आंदोलन सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी जयप्रकाश नारायण, मुरारजी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते आदींबरोबर काँग्रेसचे तरुण तुर्क मोहन धारिया, चंद्रशेखर, कृष्णकांत यांनाही तुरुंगात डांबले. जानेवारी १९७७ ला आणीबाणी उठवून इंदिरा गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुका घोषित केल्या. भारतीय जनसंघ, समाजवादी, भारतीय लोकदल, संघटना काँग्रेस या चार पक्षांचा जनता पक्ष केंद्रात सत्तेत आला तशी पक्षांच्या फाटाफुटीला वेग आला. महाराष्ट्रात वसंतदादा पाटील आणि नासिकराव तिरपुडे यांचे दोन पक्षांचे सरकार १७ एप्रिल १९७७ रोजी आले. दादा मुख्यमंत्री तर तिरपुडे उपमुख्यमंत्री होते. याच मंत्रिमंडळात शरद पवार (वय ३७) हे तरुण राज्यमंत्री होते. त्यांनी दादांच्या सरकार मधून बाहेर पडून १९ जुलै १९७८ रोजी पुरोगामी लोकशाही दल बनवून सरकार स्थापन केले. जनता पक्ष (यात संघाचे लोकही होते), शेतकरी कामगार पक्ष या सर्वात तरुण मुख्यमंत्र्यांच्या सरकार मध्ये सामील झाले होते. शरद पवार यांनी तेंव्हा समांतर काँग्रेस/समाजवादी काँग्रेस स्थापन केली होती. १९७५ साली विदर्भाच्या विरोधात दंड थोपटून मराठवाड्यात मुख्यमंत्री पद खेचून आणणारे शंकरराव भाऊराव चव्हाण यांनी महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस स्थापन करुन आधी मुख्यमंत्री पद भूषविण्याचा मान मिळविलेले पवारांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री पद स्वीकारते झाले. १९८६ साली शरद पवार यांनी काँग्रेसच्या निष्ठावंतांचा विरोध असतांनाही राजीव गांधी यांना औरंगाबाद येथे आणून आपला पक्ष काँग्रेस मध्ये विलीन केला. १९९० साली शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या आधारे केली आणि पहिल्यांदा शिवसेनेचे ५२ आणि भारतीय जनता पक्षाचे ४२ असे ९४ आमदार निवडून आले. बाळासाहेब ठाकरे यांनी डॉ. मनोहर गजानन जोशी यांना विरोधी पक्षनेते केल्यामुळे संतप्त झालेल्या छगन चंद्रकांत भुजबळ यांनी १९९१ च्या डिसेंबरमध्ये १८ आमदारांना घेऊन काँग्रेस प्रवेश केला. सहाजण पुन्हा शिवसेनेत आले त्यातूनही तीन भुजबळांकडे गेले. मग छगन भुजबळ यांना मंडल आयोग, महात्मा फुले यांची प्रकर्षाने याद आली. त्यापूर्वी छगन भुजबळ यांनी रिडल्सच्या मोर्चा नंतर हुतात्मा चौक गोमूत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण केले होते. नथुराम गोडसे यांचे पुतळे उभारण्याची त्यांची भाषणेही प्रसिद्ध झाली होती. १९९९ साली शरद पवार यांनी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्या विदेशी मूळ असल्याचा मुद्दा पुढे करत पूर्णो संगमा, तारीक अन्वर यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. नंतर संगमा आणि अन्वर यांनी पवारांची साथ सोडली. १९९९ सालीच विधानसभा निवडणुकीत शिवसेना भारतीय जनता पक्ष युती पुन्हा सत्तेवर येऊ शकली नाही आणि मुख्यमंत्री पद मिळू शकत नाही म्हणून अस्वस्थ झालेल्या नारायण तातू राणे यांनी जुलै २००५ मध्ये शिवसेनेबरोबर काडीमोड घेत काँग्रेस प्रवेश केला. २००६ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे स्वरराज श्रीकांत ठाकरे उर्फ राज ठाकरे यांनी काकांची साथ सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नांवाने सवतासुभा उभा केला. दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे यांनीही आपले काका गोपीनाथराव मुंडे यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षाच्या कमळाऐवजी पवार काकांचे घड्याळ हाती बांधले. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे या काका पुतण्या पाठोपाठ बीड जिल्ह्यात जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या काका पुतण्यांमध्ये बंडाळी पाहिल्यावर आता २३ नोव्हेंबर २०१९ या दिवशी शरद पवार यांच्या अजीतदादा पवार या पुतण्याचेही बंड पहायला मिळाले. खरंतर अजीत पवार आणि शरद पवार यांच्या आपापसातील भिन्न भूमिका महाराष्ट्रात नजीकच्या काळात पहायला मिळाल्या आहेत. शरद पवार यांनी इवीएम ला विरोध केला तर त्यांच्या सुकन्या सुप्रिया सुळे निवडून आल्या. अजीत पवार यांनी इवीएमला विरोध केला नाही पण त्यांचे सुपूत्र पार्थ पवार यांना पराभव पत्करावा लागला. शरद पवार यांनी पार्थच्या उमेदवारीला आधी विरोधही केला होता. ईडीच्या प्रकरणात शरद पवार यांच्या समर्थनार्थ राजीनामा देऊन डोळ्यात आसवं न थांबणारे अजीतदादा आपण पाहिले. पण अखेर सहनशीलता संपली, चर्चेचे गुऱ्हाळ संपत नसल्याने कंटाळा आला म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याचा निर्णय घ्यावा लागला, असे सांगत अजीतदादा या पवारकाकांच्या पुतण्याने २३ नोव्हेंबर २०१९ रोजी बंड केले. २०१४ आणि २०१९ या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षांतराचे फुटलेले पेव राज्याच्या जनतेने पाहिले आणि अनुभवले आहे. या सर्वच पार्श्वभूमीवर एकच म्हणावे लागेल की, ‘जसे पेरले तसे उगवले !’ महाराष्ट्राला दुहीचा शाप भोवतोय की हा शाप वरदानात परिवर्तित होईल, याचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले आहे. ब्रिटिशांनी जी फोडा आणि झोडा ही नीति अवलंबली, त्याची फळे आपण भोगतोय. ‘भोगा आपल्या कर्माची फळे ‘ दुसरे काय ? -योगेश वसंत त्रिवेदी,
Similar Posts
केंद्राकडून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे अमित शहांचे आश्वासन
नाशिक/ अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या नुकसानी बाबत राज्य सरकारने अहवाल पाठवावा केंद्र सरकार तातडीने मदत देईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आश्वासन दिलेगेल्या महिन्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसानं झोडपून काढलं. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. काही शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. अलिकडेच मुख्यमंत्री…
जामनेरमध्ये शेखच सिकंदर अन् चौधरीचाच विजय
नमो कुस्ती महाकुंभात उसळला कुस्तीप्रेमीचा जनसागर१५ विजेत्यांना चांदीच्या गदा, मानाचा पट्टा आणि लाखोंची बक्षिसे जामनेर, (क्री.प्र.) – नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचाचा जयघोष करत नमो कुस्ती महाकुंभात खानदेशातील लाखो प्रेक्षकांनी कुस्तीचा थरार याची देही अनुभवला. मुंगी शिरायलाही जागा नसलेल्या जामनेरमधल्या स्टेडियममध्ये सोलापूरचा सिकंदर शेख, सायगावचा विजय चौधरी आणि पंजाबच्या प्रीतपालच्या कुस्तीचा मनमुराद थरार कुस्तीप्रेमींना तब्बल सात…
एस टी कामगारांच्या संपाचा फैसला शुक्रवारी
मुंबई / एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी जी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती त्या समितीने आपला अहवाल न्यायालयात सादर केला असून शुक्रवारी या प्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे .दरम्यान या अहवालात समितीने कोणको कोणत्या शिफारशी केल्या आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.दुसरीकडे या संपाबाबत सरकार बोटचेपे धोरण स्वीकारीत असल्याने लोकांमध्ये सरकार बाबंत सुधा असंतोष आहे…
गुन्हे | महाराष्ट्र | मुंबईटाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू- अपघात की घातपात ?
पालघर / टाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला काल मुंबई / अहमदाबाद महामार्गावर चारोटी जवळ त्यांच्या कारला भीषण अपघात होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत आज गुजरात मधे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेतकाल सायरस मिस्त्री हे मुंबईवरून त्यांच्या कारणे गुजरातला…
देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेमुळे अधिक समृद्ध- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला मराठी भाषेचा गौरव
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्याच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार मुंबई – भाषा हे फक्त बोलण्याचे माध्यम नसून आपली संस्कृती, परंपरा, इतिहास आणि साहित्याशी भाषेची नाळ जोडलेली असते. आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेमुळे अधिक समृद्ध होते अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या मराठी भाषेचा गौरव केला….
पुढील मकरसंक्राती पर्यंत ठाकरे – फडणवीस एकत्र येणार – आमदार रवी राणा यांचा खळबळजनक दावा
अमरावती – विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी वाढल्या आहेत. शिवाय जो आक्रमकपणा होता तोही थोडासा मावळला आहे.त्यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा युती होणार, अशा चर्चा असातानाच ‘ पढील मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय…
