मिरजेत बँक कर्मचाऱ्याने नऊ ग्राहकांना घातला ९० लाखांचा गंडा
मिरज : मिरजेत ॲक्सिस बँकेत ग्राहकांचे पैसे इतर खात्यांवर वळवून बँकेतील नऊ ग्राहकांना सुमारे ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकणी तोहिद बशीर शरिकमसलत (वय २७, रा. मिरज) या बँक कर्मचाऱ्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोहिद याने ९० लाख ६१ हजारांची फसवणूक केल्याची तक्रार बँक व्यवस्थापक साजिद पटेल यांनी पोलिसात दिली आहे.ॲक्सिस बँकेत नवीन ग्राहकांचे खाते उघडण्याचे काम करणाऱ्या तोहिद शरीकमसलत…
