गुजरातचा जयजयकार करणाऱ्या शिंदेंची मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण
।मुंबई/गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन वाद सुरु होता. मात्र, ठाकरे बंधूंनी मोर्चाचं आयोजन केल्यानंतर तो निर्णय सरकारने मागे घेतला. मात्र, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात गुजरातचा जयजयकार केलाय. यावेळी त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’, असं म्हटलंय. एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’चा नारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया…
