देवेन सुभाष पवार : मराठमोळ्या युवा कलादिग्दर्शकाची गगन भरारी !
साधारण वीस वर्षापूर्वीची घटना. सुभाष पवार हे सद्गृहस्थ बोरीवली येथील जय महाराष्ट्र नगरात ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या घरी आले. त्यांना आपला मुलगा कलाक्षेत्रात वाकबगार असल्याचे सांगून त्याला योग्य दिशा देण्याची विनंती केली. विजय वैद्य यांनी त्यांना मुलाला घेऊन या असे सांगितले. त्याप्रमाणे ते मुलाला घेऊन आले. प्रभाकर बाणे या आपल्या मित्राकडे विजय वैद्य त्या…
