कोरोनाच्या संकटकाळात देशभरातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप सुरु
मुंबई – संपूर्ण संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असतानाच आज पासून महाराष्ट्रासह देशभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेल्याने आरोग्य सेवेवर या संपाचा गंभीर परिणाम होणार आहे. तर महाराष्ट्रात्.कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याने या संपामुळे सरकारचीही चिंता वाढलेली आहे.नीटपीजी कौन्सिलिंग प्रक्रिया रखडल्याने नवे विध्यार्थी रुजू झाले नाहीत. त्यामुळे निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण वाढतोय…
