कोविड काळात देखील स्वच्छतेची जबाबदारी मेहनतीने पार पाडणाऱ्या सफाई मित्रांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
मुंबई दि. २. कोविड काळात देखील स्वच्छतेची जबाबदारी गांभीर्याने पार पाडणार्या सफाई मित्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री म्हणतात की, आज महात्मा गांधी यांची जयंती आहे, आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देखील साजरा करीत आहोत. हे औचित्य दाखवून आपण स्वच्छतेचे काम गांभीर्याने पार पाडणाऱ्या फ्रंट लाईनर्स सफाई मित्रांचा देखील सन्मान करीत आहोत ही…
