जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार; विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक रत्न पुरस्कारांचे वितरणनाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनातून त्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यसाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी जिल्ह्याला राज्य शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आज महाकवी कालीदास कलामंदिर येथे नाशिक रत्न पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म…
