काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘महाराष्ट्र बंद’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!: नाना पटोले
प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन करणार मुंबई, दि 10 ऑक्टोबर-उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी ११ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसेच काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या…
