आयुष्याच्या संध्याकाळी ’सन्मान योजना’ सन्मानाने द्या !
महाराष्ट्रातील पत्रकारांना निवृत्तीवेतन देण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. प्रकाश बाळ जोशी, बाळ देशपांडे अशा दिग्गज पत्रकारांनी मागणी केल्यानंतर ती सर्वच पत्रकारांनी उचलून धरली आणि सरकार दरबारी अर्ज विनंत्या करीत पाठपुरावा केला. भारतातील अनेक राज्यांनी पत्रकारांना निवृत्तीवेतन देण्यास सुरुवातही केली. परंतु लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांची परंपरा सांगणार्या आणि…
