बोरीवलीतील भगवती रुग्णालयाच्या खाजगीकरणाला काँग्रेसचा तीव्र विरोध; बीएमसीची निविदा रद्द करण्याची मागणी
मुंबईतील बोरीवली येथील ४९० खाटांचे भगवती रुग्णालय सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर खाजगी संस्थेकडे सोपवण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निर्णयाविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते आमदार भाई जगताप आणि ॲड. संदेश कोंडविलकर यांनी मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांना पत्र लिहून २६ ऑक्टोबर रोजी काढलेली निविदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेत्यांच्या मते, बीएमसी कायद्याच्या…
