गरब्यासाठी बनावट पास बनवणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक
मुंबई/बोरवली च्या पश्चिमेस असलेल्या रायगड प्रतिष्ठान आयोजित, रंग रास या गरबा कार्यक्रमाचे सहाशे बनावट पास बनवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.सध्या नवरात्रीनिमित्त सर्वत्र देवीचा जागर सुरू आहे. यात गर्भारासची धूम आहे .मुंबई पुण्यासह अनेक महानगरांमध्ये विविध मंडळे व क्लबच्या माध्यमातून गरबा आणि दांडिया रास खेळाचे आयोजन करण्यात येत…
