निवडणुकीचा भरला बाजार बंडखोरी आरपार
येत्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीकडे पाहता, निवडणुकीच्या नावाने जे काही सुरू आहे ते अत्यंत क्लेशदायी आहे .यालाच का लोकशाही पद्धतीची निवडणूक म्हणायचे? या निवडणुकीत पक्षाशी बेईमानी करणारे, मतदारांशी गद्दारी करणारे, आणि लोकांना फसवणारे मोठ्या संख्येने निवडणूक लढवत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे मिळून जवळपास 50 बंडखोर…
