डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये अद्ययावत सुरक्षा यंत्रणा उभारण्याची गरज !
गेल्या दशकात डिजिटल अर्थव्यवस्थेने आपण अभूतपूर्व यश मिळवलेले आहे. मात्र त्याचवेळी डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर बोकाळल्याने सर्वसामान्यांमध्ये त्याची धास्ती, भिती वाढत आहे. डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून बेकायदेशीर कर्जांची ‘ॲप्स’ निर्माण झाली असून ‘डिजिटल ॲरेस्ट’ची प्रकरणे प्रचंड वाढताना दिसत आहेत. जनसामान्यांचे प्रबोधन केले जात असले तरी गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी डिजिटल अर्थव्यवस्थेच्या सुरक्षा यंत्रणा व धोरणात…
