चिपळूण व महाड आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक सामुग्री रवाना
विरार दि. 27: रा. स्व. संघ व जनकल्याण समिती वसईतर्फे चिपळूण व महाड आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक सामुग्री रवाना करण्यात आली. अतिवृष्टीमुळे चिपळूण व महाड येथील जनतेचे घरदार उध्वस्त झाले. आप्तस्वकीयांचा मृत्यू झाला. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कोकणातल्या बांधवांना आपत्कालीन मदतीचे वसईत समाजमाध्यमांवर मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यास वसईतील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. कमीत कमी वेळात वसईमधून…
